IMPIMP

Shivsena Chief Uddhav Thackeray | शिवसेना-संभाजी ब्रिगेड एकत्र ! उद्धव ठाकरेंनी केली घोषणा; म्हणाले -‘राज्यात मोठा इतिहास घडवू’ (व्हिडिओ)

by nagesh
Shivsena Chief Uddhav Thackeray | shivsena and sambhaji brigade together in maharashtra politics uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनसंभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) आणि शिवसेना एकत्र येणार अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषदेत केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. लोकशाही टिकवण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणे आवश्यक असल्याचे संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख प्रवक्त्यांनी म्हटले आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येून आपण मोठा इतिहास घडवू, असे उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे (Sambhaji Brigade President Manoj Akhare), मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे (Chief Spokesperson Gangadhar Banbare) उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) म्हणाले, या लढवय्या सहकाऱ्यांचे मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे. यालाच लोकशाही मानणारे लोकं आता बेतालपणे बोलत आहेत. कोर्टातील निर्णय हा देशात लोकशाही राहील की बेबंदशाही, याचा निर्णय असेल. आपल्या विचारांचे लोक आज सोबत येत आहेत प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

 

दुहीच्या शापाला गाढून टाकू

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मला आपण एकत्र आल्याचा आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे. काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात. ही आपली वैचारिक युती (Ideological Alliance) झाली आहे. महाराष्ट्रात आज जे काही घडवलं किंवा बिघडवलं ती महाराष्ट्राची ओळख नाही. शिवरायांचा महाराष्ट्र आहे असं काही जण म्हणतात पण तसं वागत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. आमचं हिंदुत्व पटल्यानं संभाजी ब्रिगेड सोबत आली आहे. आपण दुहीच्या शापाला गाढून टाकू. दोन्ही पक्षांनी मतभिन्नता कुठं आहे यावर विचार करुन समन्वयाने काम करू, असंही ठाकरे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

स्थानिक निवडणुका एकत्र लढणार

संयुक्त मेळावे घेण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडने केले आहे. गेल्या दोन अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना चांगले लोकहित पाहिले. चांगले निर्णय घेतले. आता लोकशाही धोक्यात आलेली आहे.
छोटे पक्ष, संघटना जर वाचवायच्या असतील तर एकत्र यावे लागेल, यावर आमचे एकमत झाले आहे.
शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर, संविधान याला मानणारा नवतरुण तयार करणे यासाठी आम्ही काम करु.
विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक निवडणुकांसाठी एकत्र लढण्याची तयारी केली जाणार आहे, असे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Web Title :- Shivsena Chief Uddhav Thackeray | shivsena and sambhaji brigade together in maharashtra politics uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘राज्यात गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिक सक्षम करणार’ – देवेंद्र फडणवीस

Sambhajiraje Chhatrapati | ‘उद्धव ठाकरे चालढकल करत होते, परंतु एकनाथ शिंदेंनी करुन दाखवलं’ (व्हिडिओ)

Pune-Nashik ACB Raid | लाचखोर अधिकाऱ्याकडे सापडलं मोठं घबाड ! पुण्यातील घरात सापडली लाखोची रोकड; पैसे मोजण्यासाठी मागवली मशीन

 

Related Posts