IMPIMP

Sambhajiraje Chhatrapati | ‘उद्धव ठाकरे चालढकल करत होते, परंतु एकनाथ शिंदेंनी करुन दाखवलं’ (व्हिडिओ)

by nagesh
Sambhajiraje Chhatrapati | Chhatrapati sambhaji raje says shivsena chief uddhav thackeray was playing tricks but eknath shinde did it over maratha reservation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्य शासनाच्या (State Government) विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदावरील परीक्षेत मराठा आरक्षण (Maratha Reservation) घेऊन निवडसूचीत असलेल्या 1 हजार 64 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. यादरम्यान मराठा आरक्षणासाठी लढा देणारे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चालढकल करत होते, परंतु एकनाथ शिंदे यांनी करुन दाखवले, असे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती देताना सांगितले की, आपल्या लढ्याला यश आले. शासकीय नोकऱ्यांमध्ये (Government Job) निवड झालेल्या मराठा उमेदवारांना (Maratha Candidates) नियुक्त्या मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर (Azad Maidan) माझे उपोषण सोडविताना दिलेले आश्वासन पाळले, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन असे ते म्हणाले.

 

 

कोरोना महामारीमुळे (Corona Epidemic) नियुक्ती देणे शासनाला शक्य झाले नाही. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांचा काहीही दोष नव्हता. त्यामुळे, जीवापाड मेहनत करुन मिळवलेली त्यांची हक्काची नोकरी त्यांना मिळायलाच पाहिजे होती. यासाठी या सर्व उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कायदेशीर पद्धत म्हणून अधिकसंख्या जागा निर्माण करण्याची संकल्पना सर्वप्रथम आम्ही पुढे आणली. ही संकल्पना समाजाची मागणी म्हणून आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत 29 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत मांडली आणि यानंतर वारंवार पाठपुरावा केला.

 

तक्कालीन सरकाने प्रतिसाद दिला नाही

कोल्हापूर येथे मूक आंदोलनानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व राज्य सरकारसोबत 17 जून 2021 रोजी झालेल्या बैठकीत हा मुद्दा आम्ही मांडला. त्यांनी यावर निर्णय घेण्यासाठी 15 दिवसांचा वेळ मागितला. परंतु महिना उलटून गेला तरी त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. म्हणून आम्ही नाशिक (Nashik), नांदेड (Nanded), रायगड (Raigad), सोलापूर (Solapur) याठिकाणी आंदोलन केले. मात्र, तब्बल 8 महिने सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उद्धव ठाकरेंनी चालढकलपणा केला

सर्व उमेदवार वेळोवेळी मला भेटून त्यांच्या व्यथा सांगत होते. अपेक्षा व्यक्त करत होते. अखेर सरकारला जाग करण्यासाठी फेब्रुवारी 2022 मध्ये आझाद मैदान येथे मी स्वत: आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसलो. यावेळी, राज्य सरकार सोबत समन्वयकांची बैठक झाली असता, नियुक्त्यांच्या बाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चालढकल करत हेते.

 

लेखी आश्वासन दिले मात्र…

बैठकीत हा मुद्दा अत्यंत ठामपणे मांडल्याने त्याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी याविषयी सकारात्मकता दर्शवली. स्वत: एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी येऊन मराठा उमेदवारांना आम्ही सुचवलेल्या पद्धतीनुसार अधिकसंख्या जागा निर्माण करुन नियुक्त्या देऊ असे लेखी आश्वासन दिले. मात्र पुढचे चार महिने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंमलबजावणी केली नाही.

 

एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला न्याय दिला

यानंतर स्वत: एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागील
सरकार मध्ये असताना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन दिली.
नैतिक जबाबदारी म्हणून या आश्वासनाची पूर्तता करावी, असे निवेदन दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची देखील भेट घेऊन
त्यांनाही हा विषय समजावून सांगत उमेदवारांना न्याय देण्याची मागणी केली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अधिसंख्या जागा निर्माण करुन
मराठा उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सर्व उमेदवार व समाजाच्या वतीने
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र विधीमंडळ (Maharashtra Legislature) व
राज्य सरकारचे आभार व अभिनंदन, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

 

Web Title :- Sambhajiraje Chhatrapati | Chhatrapati sambhaji raje says shivsena chief uddhav thackeray was playing tricks but eknath shinde did it over maratha reservation

 

हे देखील वाचा :

Pune-Nashik ACB Raid | लाचखोर अधिकाऱ्याकडे सापडलं मोठं घबाड ! पुण्यातील घरात सापडली लाखोची रोकड; पैसे मोजण्यासाठी मागवली मशीन

Pune Crime | पिडित महिलेला गुन्हेगारची धमकी

Pune Crime | बिबवेवाडी गोळीबार प्रकरणातील मोक्कातील आरोपींना जामीन

 

Related Posts