IMPIMP

Shivsena | सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीआधी उद्धव ठाकरे गटाला दिलासा, विधान परिषदेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता

by nagesh
Maharashtra Political News | all remaining 13 mlas of thackeray faction in touch with cm eknath shinde says uday samant

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटात (Shinde Group) वाद सुरु असताना सुप्रीम कोर्टाच्या
(Supreme Court) सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगासमोरही (Election Commission) दोन्ही गट आमने-
सामने असून शिवसेना (Shivsena) पक्षाचे चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी संघर्ष सुरु आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला
आहे. विधान परिषदेत (Legislative Council) शिवसेना (Shivsena) पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महाराष्ट्र विधीमंडळाच्या सचिवालयाकडून अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली आहे. विधान परिषदेचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत (Principal Secretary Rajendra Bhagwat) यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधान परिषदेतील शिवसेना (Shivsena) पक्षास अधिकृत विरोधी पक्ष (Opposition Party) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तसेच शिवसेनेचे औरंगाबादमधील आमदार अंबादास दानवे (MLA Ambadas Danve) यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे आहे. विधानपरिषदेत शिवसेनेकडे संख्याबळ अधिक असल्याने विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी असे पत्र शिवसेनेकडून देण्यात आले होते. त्यानुसार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले.

Web Title : – Shivsena | shivsena uddhav thackeray ambadas danve opposition leader vidhan parishad

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | नाराजी नाट्य ? 6 ते 7 वजनदार आमदार एकनाथ शिंदेंना वैयक्तिकरीत्या भेटले अन्

Pune Crime | धक्कादायक! पती घरात नसताना नातेवाईक तरुणाकडून विवाहितेवर वर्षभर बलात्कार, फोटो व्हायरल करण्याची धमकी

Pune Crime | हात उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मानसिक त्रासामुळे तरुणीची आत्महत्या; चंदननगर-खराडी परिसरातील घटना

Related Posts