IMPIMP

Pune Crime | हात उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मानसिक त्रासामुळे तरुणीची आत्महत्या; चंदननगर-खराडी परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | Young woman commits suicide due to psychological distress after demanding money lent; Incidents in Chandannagar-Kharadi area

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | हात उसने पैसे दिले असताना ते वेळोवेळी परत मागून सुद्धा दिले नाही. तिला मानसिक त्रास
दिल्याने या तरुणीने आत्महत्या (Suicide In Pune of Young Girl) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

ऐश्वर्या सरवसे (वय २८, रा. गलांडे इंडस्टियल इस्टेट, खराडी – Kharadi) असे या तरुणीचे नाव आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी तिचे वडिल बालाजी सरवसे (वय ४८, रा. उस्मानाबाद) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २९२/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रणीत दत्तात्रय जगताप-पाटील (रा. परंडा, जि. उस्मानाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार खराडी येथील व्हिजन होममध्ये १५ जानेवारी रोजी घडला होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी ऐश्वर्या ही आणि प्रणीत जगताप पाटील हे एकमेकांच्या ओळखीचे होते.
ऐश्वर्या हिने आरोपीला काही हात उसने पैसे दिले होते. फिर्यादी यांच्या मुलीने वेळोवेळी पैसे परत मागून सुद्धा त्याने ते परत दिले नाहीत.
पैसे परत करण्यास नकार देऊन तिला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली.
तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याने प्रणीत जगताप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Young woman commits suicide due to psychological distress after demanding money lent; Incidents in Chandannagar-Kharadi area

 

हे देखील वाचा :

Shivsena | मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत ?, शिवसेनेच्या मुखपत्रातून मंत्रिमंडळावर टीकास्त्र

Pune Crime | परवान्यामध्ये खाडाखोड केल्याने चंदननगर परिसरातील गिरणी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

NCP Chief Sharad Pawar | भाजपकडून प्रादेशिक पक्षांना कसं संपवलं जातं, शरद पवारांनी मांडली ‘परफेक्ट’ थिअरी

 

Related Posts