IMPIMP

CM Eknath Shinde | नाराजी नाट्य ? 6 ते 7 वजनदार आमदार एकनाथ शिंदेंना वैयक्तिकरीत्या भेटले अन्

by nagesh
CM Eknath Shinde | information is coming out that some mlas of the shinde faction feel injustice in the cabinet expansion

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन CM Eknath Shinde | राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाल्यानंतर अनेक बाबतीत हा विस्तार राजकीय क्षेत्रात चर्चेचा आणि वादाचा विषय झाला आहे. सत्तार (Abdul Sattar) आणि राठोड (Sanjay Rathod) यांचा मंत्रिमंडळात झालेला समावेश वादग्रस्त ठरलेला असतानाच आता मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. शिंदे गटात सर्वात शेवटी आलेल्यांना आधी मंत्रिपद मिळाल्याबद्दल ही नाराजी आहे. (CM Eknath Shinde)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुरूवातीपासून एकनाथ शिंदे यांना साथ देऊन शिवसेनेत बंड घडवून आणण्यात महत्वाची भूमिका पार पाडणार्‍यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने ही नाराजी आहे. मुंबईतील पाच आमदारांनी बंड करत शिवसेनेला धक्का देणे खुप जोखमीचे आणि आव्हानाचे होते, या पाच जणांनाच शिंदे गटाने मंत्रिपदापासून दूर ठेवले आहे. यामुळे नाराजीचा सूर तीव्र आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी सप्टेंबरमध्ये पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे अश्वासन दिले जात आहे. मात्र, त्यावेळी सुद्धा शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. (CM Eknath Shinde)

 

अब्दूल सत्तार आणि संजय राठोड यांना दिलेले मंत्रिपद सध्या वादग्रस्त ठरले आहे.
यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरले आहे. शिवाय, सरकारच्या प्रतिमेला सुद्धा पहिल्याच टप्प्यात गालबोट लागल्याचे बोलले जात आहे.
ज्यांना काल मंत्रिपद मिळाले त्यापैकी दीपक केसरकर, संजय राठोड, दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत हे शिंदे गटात खुप उशीरा दाखल झाले होते.
त्यांना पहिल्याच टप्प्यात मंत्रिपद देण्यात आले. शिंदे गटात जाण्याचा क्रम बघितला तर हे पाचजण 34 ते 38 व्या क्रमांकावर होते.

 

दरम्यान, शिंदे यांनी आमदारांच्या शपथविधीपूर्वी बैठक घेतलेल्या बैठकीत कोणीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली नसली तरी सहा ते सात वजनदार आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना वैयक्तिकरीत्या भेटून आपल्या मनातील रोष बोलून दाखवल्याचे सूत्रांकडून समजते.

 

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राजीनामा द्यावा लागलेले वादग्रस्त संजय राठोड यांना पहिल्याच टप्प्यात मंत्री केल्याने विरोधकांसह भाजपामध्ये सुद्धा नाराजी आहे.
भाजपामधील नाराजी ही आता लपून राहिली नसून उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे.
भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तर राठोड यांना आव्हानच दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड यांना सुरुवातीला मंत्री करू नका, विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर संधी द्या, असा आग्रह भाजपने धरला होता. पण, तो फेटाळण्यात आला.
कारण राठोड हे शिंदेंचे निष्ठावंत आहेत. मात्र, यामुळे भाजपाचीच जास्त अडचण झाली आहे.
कारण, पूजा चव्हाण प्रकरण उघड झाले तेव्हा भाजपाचे चंद्रकांत पाटील, किरिट सोमया आणि चित्रा वाघ यांनी रान उठवले होते.
यामुळे संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

 

दुसरीकडे बंड घडवून आणण्यात ज्यांनी सुरूवातीपासून महत्वाची भूमिका बजावली ते बालाजी किणीकर, संजय शिरसाट,
भरत गोगावले, आशिष जयस्वाल आणि महेश शिंदे यांना मंत्रिपद पहिल्या टप्प्यात देण्यात आले नाही,
यामुळे भविष्यात शिंदे गटातील नाराजी वाढत जाणार असल्याचे चिन्ह आहे.

 

Web Title : – CM Eknath Shinde | information is coming out that some mlas of the shinde faction feel injustice in the cabinet expansion

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक! पती घरात नसताना नातेवाईक तरुणाकडून विवाहितेवर वर्षभर बलात्कार, फोटो व्हायरल करण्याची धमकी

Pune Crime | हात उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मानसिक त्रासामुळे तरुणीची आत्महत्या; चंदननगर-खराडी परिसरातील घटना

Shivsena | मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत ?, शिवसेनेच्या मुखपत्रातून मंत्रिमंडळावर टीकास्त्र

 

Related Posts