IMPIMP

Shobha R. Dhariwal | प्लास्टिक सर्जरीने रुग्णांना मिळाली जीवन जगण्याची नवीन उमेद – शोभा आर धारीवाल

by nagesh
Shobha R. Dhariwal | Plastic surgery gives new hope to patients - Shobha R Dhariwal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Shobha R. Dhariwal | आर एम डी फाउंडेशन (RMD Foundation) द्वारा मदनबाई माणिकचंद धारीवाल रुग्णालय शिरूर (Madanbai Manikchand Dhariwal Hospital Shirur) येथे अग्रवाल क्लब पुणे चॅरिटेबल ट्रस्ट (Agarwal Club Pune Charitable Trust) यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि हँड सर्जरी शिबिर नुकतेच संपन्न झाले.त्याप्रसंगी आर एम डी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा आर धारीवाल (Shobha R. Dhariwal) यांनी आपले मत व्यक्त केले.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाराष्ट्र व राज्याबाहेरून जळालेले रुग्ण, जन्मता असलेले हाताचे पायाचे व शरीरावरील व्यंग ,जुळलेले वाकडी कमी जास्त बोटे ,मस व चेहऱ्यावरील वाकडे व्रण, दुभंगलेले ओठ व टाळू वाकडे नाक, कान हनुवटीचा आकारात बदल व अपघाताने आलेले व्यंग ईत्यादी प्रकारातील रुग्ण दरवर्षी या शिबिरामध्ये येतात व मोफत सर्जरीचा फायदा घेतात मागील बारा वर्षापासून हे शिबिर नियमितपणे राबवण्यात येत असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. (Shobha R. Dhariwal)

 

शनिवार (दि. 7) व रविवार (दि. 8) असे दोन दिवशीय कालावधीत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते . एकूण २५० रुग्णांची तपासणी करून ७६ रुग्णांची यशस्वी सर्जरी करण्यात आली . यावेळी मागील १० वर्षांपूर्वी एका सहा महिन्याच्या मुलीचे २४ बोटं चिकटलेली होती तेंव्हा पासून तिचे उपचार चालू होते व या शिबिरामध्ये शेवटचे राहिलेले बोट यशस्वीरित्या वेगळे केल्या गेले आता ती पूर्णपणे बोटांची हालचाल करू शकते याबाबत तिने डॉक्टर चमूचे व रुग्णालयाचे उपकार कधीच विसरू शकणार नाही अशी भावना व्यक्त केली.

 

शिबिर यशस्वी होण्यासाठी अग्रवाल क्लब पुणे चॅरिटेबल ट्रस्टचे उमेश जालन ,
डॉ. पंकज जिंदल प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन, डॉ .सुब्रह्मण्यम ,डॉ. स्वप्ना आठवले प्लास्टिक सर्जन यांनी
तसेच मदनबाई माणिकचंद धारिवाल रुग्णालयाचे डॉ . प्रशांत केदारी बालरोग विशेषज्ञ ,
डॉ . रवींद्र चौहान ऑर्थोपेडिक सर्जन, डॉ .गुप्ता, डॉ. अरविंद जैन, वंदना सागवेकर, आयसीयू स्टाफ, नर्स यांनी प्रयत्न केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shobha R. Dhariwal | Plastic surgery gives new hope to patients – Shobha R Dhariwal

 

हे देखील वाचा :

Thane ACB Trap | 20 हजाराची लाच घेताना 2 पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला 12 वर्षाच्या मुलीने मारली लाथ; प्रसंगावधाने टळला अत्याचाराचा प्रकार

Uorfi Javed | उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्यीची शक्यता, धमकी देणाऱ्या चित्र वाघ यांच्यावर कारवाई करा; अ‍ॅड. नितीन सातपुतेंची महिला आयोगाकडे तक्रार

 

Related Posts