IMPIMP

Uorfi Javed | उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्यीची शक्यता, धमकी देणाऱ्या चित्र वाघ यांच्यावर कारवाई करा; अ‍ॅड. नितीन सातपुतेंची महिला आयोगाकडे तक्रार

by nagesh
Uorfi Javed | there are chances of mob lynching by the hands of chitra wagh and their party workers complaint adv nitin satpute in maharashtra women commission

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन– भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांच्या धमकीमुळे अभिनेत्री उर्फी जावेदचं (Uorfi Javed) मॉब लिंचिंग (Mob Lynching) होण्याची शक्यता असल्याची तक्रार अ‍ॅड. नितीन सातपुते (Adv. Nitin Satpute) यांनी महिला आयोगाकडे (Women’s Commission) केली आहे. सातपुते यांनी लेखी आणि ऑनलाईन तक्रार केली असून चित्रा वाघ यांच्यावर पोलीस कारवाई (Police Action) करण्याची मागणी त्यांनी केली आहे. चित्रा वाघ यांच्या उर्फी जावेदबाबत (Uorfi Javed) ‘दिलेस तिथे थोबाड फोडण्यात येईल’, या वक्तव्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मागील काही दिवसांपासून चित्रा वाघ आणि उर्फी जावेद (Uorfi Javed) यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यांवर आक्षेप घेत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) केली होती. याबाबत त्यांनी मुंबई पोलिसांना पत्र दिलं आहे. त्यावर ‘माझा नंगानाच सुरुच राहिल’ असं प्रत्युत्तर उर्फी जावेदने दिले होते.

 

काय म्हटले तक्रारीत?

उर्फी जावेदच्या कपडे परिधान करण्याच्या स्टाईलवरुन चित्रा वाघ लोकांना गुन्हा (Crime) करण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यांचे समर्थक उर्फीला ट्रोल करत असून तिची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी तिला भररस्त्यात थोबाडीत मारण्याची धमकी (Threat) दिली आहे.
डिसेंबर 2022 मध्ये चित्रा वाघ यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना उर्फीला थोबाडीत मारण्याची खुलेआम धमकी दिली होती.

 

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?

ज्या दिवशी माझ्या हातात सापडेल, त्या दिवशी पहिल्यांदा थोबडवेल आणि नंतर मी ट्विट करुन सांगेन की मी काय
केलंय ते. आजही सांगते उर्फी जावेत समोर आली तर तिला आधी साडी चोळी देऊ.
मात्र त्यानंतरही तिने तिचा नंगानाच सुरु ठेवला तर थेट थोबाड फोडणार आहे.
उर्फीला कपड्यांची अ‍ॅलर्जी असेल तर सगळ्या प्रकारच्या गोळ्या देण्यास सक्षम आहोत,
असे चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uorfi Javed | there are chances of mob lynching by the hands of chitra wagh and their party workers complaint adv nitin satpute in maharashtra women commission

 

हे देखील वाचा :

Success Story | नोकरी सोडून बनली ‘BSc चहावाली’, वडिलांनी तोडले नाते, इतक्या कमाईमुळे तुफान चर्चेत

Pune Municipal Corporation (PMC) | पिचकारी बाहद्दरांवर वचक बसवण्यासाठी महापालिकेची कडक कारवाई, थुंकलेल्या ठिकाणाची करुन घेतली साफ-सफाई

Chandrashekhar Bawankule | सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार?; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

 

Related Posts