IMPIMP

Pune Crime News | बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला 12 वर्षाच्या मुलीने मारली लाथ; प्रसंगावधाने टळला अत्याचाराचा प्रकार

by nagesh
Pune Crime News | Sahakarnagar Police Station - Pune Minor Girl Rape Case FIR On Omkar Nandu Jadhav

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Crime News | मावशीने बोलावले, असे सांगून एका १२ वर्षाच्या मुलीला त्याने जवळच्या झाडीत नेले. तिथे
तिच्यावर त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या मुलीने धाडसाने त्याला विरोध करुन त्या नराधमाला लाथ मारुन आपली सुटका करुन घेतली.
ही घटना वानवडीतील (Wanwadi) चिमटा वस्ती येथे १० जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली.  (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत घोरपडीतील एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६/२३) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १२ वर्षाची मुलगी रस्त्याने जात होती. त्यावेळी एका नराधमाने तिला डोळ्याने इशारा करुन आपल्याजवळ बोलावले. (Pune Crime News)

 

तुला तुझ्या मावशीने बोलावले, असे खोटे सांगून तिला आड बाजूला घेऊन गेला.
तिचा हात पकडून त्याने स्वत:ची पँट काढली व तिच्यावर तो बळजबरी करण्यासाठी तिच्याजवळ जाऊ लागला.
तेव्हा या मुलीने त्याला लाथ मारुन दूर केले. तिचा हा आक्रमक पवित्रा पाहून तो पळून गेला़.
त्यानंतर घाबरलेल्या या मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला.
त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | 12-year-old girl kicks murderer who tried to rape her; A type of abuse avoided by chance

 

हे देखील वाचा :

Uorfi Javed | उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्यीची शक्यता, धमकी देणाऱ्या चित्र वाघ यांच्यावर कारवाई करा; अ‍ॅड. नितीन सातपुतेंची महिला आयोगाकडे तक्रार

Success Story | नोकरी सोडून बनली ‘BSc चहावाली’, वडिलांनी तोडले नाते, इतक्या कमाईमुळे तुफान चर्चेत

Pune Municipal Corporation (PMC) | पिचकारी बाहद्दरांवर वचक बसवण्यासाठी महापालिकेची कडक कारवाई, थुंकलेल्या ठिकाणाची करुन घेतली साफ-सफाई

 

Related Posts