Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune) बाप्पांचे बुधवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), अभिनेत्री चित्रांगदा सिंग (Chitrangada Singh), दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे (Sanjay Awate), वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांच्यासह अनेक मान्यवरांनी आरती करून दर्शन घेतले. ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीतदादा बालन (Punit Balan) यांनी मान्यवरांचा सन्मान केला. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
बुधवार हा गणेशोत्सवाचा 9 वा दिवस असल्याने भाविकांनी बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी सपत्नीक दाखल झाले. त्यांच्यासमवेत भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), भाजप युवा मोर्चाचे राघवेंद्र उर्फ बापु मानकर (Raghvendra Alias Bapu Mankar) हे उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी सपत्नीक बाप्पांची आरती करून दर्शन घेतले. ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीतदादा बालन यांनी त्यांचा सन्मान केला. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune)
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी देखील बाप्पांची आरती करून दर्शन घेतले. दिवसभरात पावसाच्या सरी सुरू असताना देखील भाविकांची प्रचंड गर्दी पहावयास मिळाली. बाप्पांची महाआरती करण्यासाठी प्रसिध्द सिने अभिनेत्री चित्रांगदा सिंग ही सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दाखल झाली. महाआरतीसाठी दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी महाआरती करून बाप्पांचे दर्शन घेतले. पुनीतदादा बालन यांनी मान्यवरांचा सन्मान केला. रात्री उशिरापर्यंत बाप्पांच्या दर्शनासाठी गर्दी होती.
- Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ
- Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव
Comments are closed.