IMPIMP

Side Effects Of Toor Dal | किडनी आणि युरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नका तूर डाळ..

by sachinsitapure
Side Effects Of Toor Dal

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – आपल्या दैनंदिन आहारात कडधान्ये अतिशय सामान्य असतात (Side Effects Of Toor Dal). हे जवळजवळ प्रत्येक घरात दररोज खाल्ले जाते. अनेकांचे जेवणही त्याशिवाय पूर्ण होत नाही. परंतु या डाळी प्रत्येकाने खाणं योग्य नाही. अनेकांना डॉक्टर या डाळी खाण्यास सक्त मनाई करतात. जाणून घेऊया कोणत्या रूग्णांनी तूर डाळीचे सेवन करू नये (Side Effects Of Toor Dal).

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

तुमचे युरिक अॅसिड (Uric Acid) वाढले असेल, तर तुम्ही तूर डाळ खाऊ नये. या डाळीमध्ये प्रथिने (Protein) भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनामुळे युरिक ऍसिडची पातळी (Uric Acid Level) अनियंत्रित होऊ शकते. अशा स्थितीत तुम्हाला हात, पाय आणि सांधे सुजण्याची समस्या असू शकते.

किडनीच्या आजाराने (Kidney Patient) त्रस्त असलेल्यांनी सुद्धा या डाळीपासून दूर राहावे. या डाळीमध्ये पोटॅशियम (Potassium) मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे किडनीच्या समस्या (Kidney Problem) आणखी वाढू शकतात. यामुळे तुम्हाला मुतखडा (Kidney Stone) होण्याची शक्यता असते.

अॅसिडिटीचा त्रास (Acidity Problem) असलेल्यांनी ही डाळ रात्री कधीही खाऊ नये. तूर डाळ पचायला वेळ लागतो.
यामुळे तुम्हाला ढेकर येणे (Belching), गॅस (Gas) आणि पोटदुखी (Stomach Pain) सारख्या समस्या होऊ शकतात.

तुम्हाला मूळव्याधचा (Piles) त्रास असेल, तूर डाळीचे सेवन करण्यापासून दूर राहावे.
ही डाळ पचायला खूप वेळ लागतो.
यामुळे पोट साफ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.
त्यामुळे मूळव्याध रुग्णांना (Piles Patients) मोठा त्रास सहन करावा लागतो (Side Effects Of Toor Dal).

रात्रीच्या वेळी तूर डाळ खाल्ल्याने अनेकांना पचनामध्ये समस्या (Problems In Digestion) येऊ शकतात.
तुम्हाला ही तूर डाळ खाल्ल्यानंतर अॅलर्जी (Allergy) सारख जाणवत असेल, तर त्याचे सेवन करू नका.
नेहमी दिवसा जेवनामध्ये तूर डाळीचे सेवन करावे.

Related Posts