IMPIMP

Sindhutai Sapkaal Passed Away | अनाथांची माय जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे 73 व्या वर्षी पुण्यात निधन

by nagesh
Sindhutai Sapkal Passed Away | Great indian social worker padma shri sindhutai sapkal dies at 73 in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Sindhutai Sapkaal Passed Away | अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital Pune) निधन झाले आहे. त्या 73 वर्षांच्या होत्या. सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkaal Passed Away) यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा संभाळ केला आहे. त्यांच्या निधनामुळे अनेक मुले पोरकी झाल्याची भावना समाज माध्यमातून उमटत आहे.

सिंधुताई सपकाळ यांना हार्नियाचा (Hernia) त्रास होता. आठ दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागल्याने पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज (मंगळवार) दुपारी त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. (Sindhutai Sapkaal Passed Away)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव येथे झाला होता. नको असताना मुलगी झाल्याने त्यांचे नाव चिंधी असे ठेवण्यात आले. त्यांचे शिक्षण जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत झाले होते. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांचे एका 26 वर्षांनी मोठ्या असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी विवाह झाला. 18 व्या वर्षापर्य़ंत त्यांची तीन बाळंतपणे झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला आणि तेथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. (Sindhutai Sapkaal Passed Away)

 

सिंधुताई यांनी सहा संस्था स्थापन केल्या आहेत. त्यापैकी पुण्यातील हडपसर येथील बाल निकेतन (Bal Niketan Hadapsar) ही संस्था आहे.
त्या आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्य़ासाठी निधी गोळा करण्याच्या हेतूने परदेशात (Abroad) देखील गेल्या.
आपल्या बोलण्याने आणि काव्याने त्यांनी समाजाला प्रभावीत केले.
परदेशी अनुदान मिळणे सोपे नसल्याने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली.
सिंधुताईंना तब्बल 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
मागील वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

 

 

Web Title :- Sindhutai Sapkal Passed Away | Great indian social worker padma shri sindhutai sapkal dies at 73 in pune

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | महाराष्ट्र खंबीर ! उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले – ‘2 वर्षांच्या काळात सरकारला साथ, सहकार्य दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या तमाम बंधुभगिनी, मातांचे, युवा मित्रांचे आभार’

Ajit Pawar | विना मास्क 500 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास थेट 1000 रुपये दंड आकारण्याचे अजित पवारांचे निर्देश

Ajit Pawar | पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 18 टक्के, अजित पवारांचे काळजी घेण्याचे आवाहन

Related Posts