IMPIMP

Sourav Ganguly | सौरव गांगुलीला ICC मध्ये मिळणार मोठी जबाबदारी ! जाणून घ्या दादाच्या नव्या ‘इनिंग’बाबत

by nagesh
Sourav Ganguly | bcci chief sourav ganguly set to replace anil kumble as technical committee chairman of icc

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sourav Ganguly | बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यांच्यावर इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल समिती (ICC) लवकरच मोठी जबाबदारी देणार आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीचं अध्यक्षपद सौरव गांगुलीला देण्यात येणार आहे. याअगोदर हि जबाबदारी टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि सौरव गांगुलीचा सहकारी अनिल कुंबळे ( Anil Kumble) यांच्याकडे होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

अनिल कुंबळेची 2012 साली वेस्ट इंडिजचे माजी कॅप्टन क्लाईव्ह लॉयड (Clive Llyod) यांच्या जागी 2012 साली क्रिकेट कमिटीच्या अध्यक्षपदावर
नियुक्ती झाली होती. यानंतर 2016 साली कुंबळेला मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर आता ही मुदत संपल्यानंतर त्याच्या जागी गांगुलीची (Sourav Ganguly) नियुक्ती करण्यात येणार असल्याचे समजत आहे. क्रिकेटमधील नियम तयार करणे आणि त्याचे नियमन करणे ही जबाबदारी या समितीकडे असते.

 

BCCI साठी आनंदाची बातमी

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलनं (ICC) म्हणजेच ICC ने 2024 ते 2031 या कालावधीत होणाऱ्या 8 मोठ्या स्पर्धांची घोषणा केली आहे. या 8 स्पर्धांपैकी 3 स्पर्धांचं यजमानपद भारताला मिळालं आहे. भारतामध्ये 2026 साली टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup), 2029 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) आणि 2031 साली वन-डे वर्ल्ड कप (One-Day World Cup) होणार आहे. या तीन मोठ्या स्पर्धांमुळे बीसीसीआयला (BCCI) मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व स्पर्धांसाठी आयसीसी भारत सरकारला 10 टक्के टॅक्स देणार आहे. त्यामुळे बीसीसीआयचे (BCCI) 1500 कोटी रुपये वाचणार आहेत.

 

Web Title :- Sourav Ganguly | bcci chief sourav ganguly set to replace anil kumble as technical committee chairman of icc

 

हे देखील वाचा :

Modi Government | दररोज 7 रूपयांची बचत करून दरमहा मिळवा 5000 रूपये, जाणून घ्या मोदी सरकारची ‘ही’ जबरदस्त स्कीम

Sameer Wankhede | NCB अधिकारी समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम? उच्च न्यायालयात कागदपत्रे दाखल

IND Vs NZ | न्यूझीलंडविरुद्धच्या T20 सिरीजपूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितला टीम इंडियाचा ‘मास्टर प्लॅन’

 

Related Posts