IMPIMP

State Government Employees | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, दिवाळीपूर्वीच मिळणार महिन्याचा संपूर्ण पगार

by nagesh
Govt Bank FD Interest Rate | story these government banks are giving interest rate of more than 7 persent on fd

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना (State Government Employees) दिवाळी (Diwali) गिफ्ट दिलं असून राज्य सरकारी कमचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन (October Salary) दिवाळीपूर्वीच मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी येत आहे, त्यामुळे त्याच्या आधीच कर्मचाऱ्यांचा (State Government Employees) पगार करण्याचा निर्णय राज्यातील शिंदे सरकारने (Shinde Government) घेतला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दिवाळीचा (Diwali) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सगळीकडे दिवाळीचा माहोल आहे. त्यामुळेच दिवाळीसाठीचा मिळणारा बोनस आणि पगार याची चर्चा नोकरदारांमध्ये होत आहे. अनेक ठिकाणी बोनस वाटप झाले असून पगारही दिवाळीपूर्वीच देण्याचा निर्णय झाला आहे. आता, सरकारी कर्मचाऱ्यांनाही दिवाळीपूर्वीच ऑक्टोबर महिन्याचे वेतन आदा केले जाणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

 

 

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन सरकारी नोकरदारांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी (Pensioners) आनंदाची बातमी दिली आहे. 22 ऑक्टोबर पासून दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे.
त्यामुळे राज्य सरकारच्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार जो नोव्हेंबर महिन्यात केला जातो.
मात्र, दिवाळी सणासाठी या कर्मचारी आणि पेशन्शनधारकांना आर्थिक अडचण भासू नये,
यासाठी या सर्वांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वीच केला जाणार आहे.
त्यासाठीचा आदेशही निर्गमित करण्यात आला आहे.
त्यानुसार आता या कर्मचाऱ्यांना 21 ऑक्टोबर रोजीच वेतन मिळणार असून सर्वांची दिवाळी गोड होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- State Government Employees | diwali 2022 gift to state government employees october salary will be on 21st before diwali

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | अखेर जळगाव जिल्हा दूध संघाच्या अपहार प्रकरणाचा गुन्हा दाखल; एकनाथ खडसेंचे पोलिसांवर मोठे आरोप

Ajit Pawar | मंत्री अर्वाच्च भाषेत अधिकार्‍यांशी बोलतात, बाप काढतात, ही संस्कृती? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही का?, अजित पवारांचा परखड सवाल (व्हिडिओ)

Eknath Khadse | ‘भाजपला माघारच घ्यायची होती, तर…’, एकनाथ खडसेंचा भाजपवर हल्लाबोल

 

Related Posts