IMPIMP

Summer Food | इम्यूनिटी मजबूत करण्यापासून वृद्धत्व रोखण्यापर्यंत, खरबूज खाण्याचे ‘हे’ 6 फायदे, जाणून घ्या

by nagesh
 Summer Food | health benefits of eating muskmelon in summer

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Summer Food | उन्हाळा सुरू झाला आहे. हवामान बदलल्याने शरीराची काळजी घेणे खुप आवश्यक आहे. या
काळात शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक असते. उन्हाळ्यात (Summer Food) खरबूज आरोग्यासाठी खुप लाभदायक ठरते. यामुळे पाण्याची कमतरता
दूर होते. याचे इतर फायदे जाणून घेवूयात…

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

1. पोटाच्या मांसपेशी
यातील फोलिकमुळे रक्तात होणार्‍या गाठी रोखल्या जातात. वॉटर रिटेंशन कमी करते. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास हात, पाय, चेहरा आणि पोटाच्या मांसपेशींना सूज येते. खरबूज सेवन केल्याने ही समस्या दूर होते. पीरियड्समधील मांसपेशींचे दुखणे कमी करते.

 

2. तळलेले-भाजलेले
उन्हाळ्यात तापमानामुळे पोट खराब होते. या काळात जास्त तळलेले आणि भाजलेले खाल्ल्याने अनेक समस्या होतात. खरबूजमध्ये फायबर असल्याने पोटाच्या समस्या होत नाहीत. (Summer Food)

 

3. खरबूजमध्ये भरपूर असते व्हिटॅमिन सी
यातील व्हिटॅमिन सी मुळे पांढर्‍या रक्तपेशी वाढल्याने इम्यूनिटी वाढते. शरीर निरोगी रहाते. बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका दूर होतो. यामध्ये अँटी-एजिंग गुण आढळतात. ज्यामुळे व्यक्ती लवकर वृद्ध होत नाही. पोटाचा अल्सर दूर राहतो.

4. व्हिटॅमिन ए बीटा-कॅरोटीन
खरबूजमध्ये व्हिटॅमिन ए बीटा-कॅरोटीनच्या रूपात असते. हे डोळयांची दृष्टी मजबूत करते. मोतीबिंदूचा धोका कमी करते. त्वचेच्या वरील पेशींसाठी लाभदायक आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

5. इलेक्ट्रोलाईडचे संतुलन
उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील आवश्यक मिनरल बाहेर पडतात, यामुळे इलेक्ट्रोलाईट बॅलन्स कमी होतो. खरबूजमध्ये सोडियम आणि पोटॅशियमची योग्य मात्रा असल्याने ते इलेक्ट्रोलाईटचे संतुलन कायम राखते. किडनी स्टोनवर खरबूज चांगला पर्याय आहे.

 

6. रक्तातील गाठी
खरबूजमधील एडीनोसीन रक्त पातळ करण्याचे काम करते. यामुळे रक्तात गुठळ्या होत नाहीत.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Summer Food | health benefits of eating muskmelon in summer

 

हे देखील वाचा :

Pune News | युवराज ढमालेंसह भागीदारांकडून महापालिका व रहिवाशांची फसवणूक झाल्याचा आरोप; बेकायदेशीर बांधकामावर कारवाईची मागणी, कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा

Pune Crime News | 34 वर्षीय पोलिस कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

 

Related Posts