IMPIMP

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

by nagesh
OBC Political Reservation In Maharashtra | obc reservation decision for 92 municipal councils postponed special bench to be constituted for hearing

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान (Rainy Convention) विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये घातलेल्या गोंधळ याप्रकरणी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन (BJP 12 MLA Suspended) केले होते. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात देखील ही कारवाई मागे घेतली नाही. दरम्यान, या प्रकरणी भाजपच्या 12 निलंबित आमदारांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली होती. दरम्यान या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) या निर्णयावरुन राज्य सरकारवर (State Government) कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

12 आमदारांच्या निलंबन प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दिवसभर झालेल्या युक्तिवादात सुप्रीम कोर्टाने या कारवाईवर कडक ताशेरे ओढले आहेत. आमदारांचं निलंबन हा सर्वस्वी सभागृहाचा निर्णय असला तरी 60 दिवसांपेक्षा अधिक काळासाठी ते करता येणार नाही, असं कोर्टाने आपल्या निरीक्षणात म्हटले आहे.

 

 

12 आमदारांवर झालेली निलंबनाची कारवाई ही बरखास्तीपेक्षा जास्त कडक असल्याचे मत कोर्टाने नोंदवलं. दरम्यान, निलंबनाच्या कारवाईत कोर्ट सहसा ढवळाढवळ करत नाही. हा सभागृहाचा अधिकार असतो, असा युक्तीवाद महाराष्ट्र सरकारच्यावतीने (Government of Maharashtra) करण्यात आला. मात्र, या कारवाईत केवळ आमदारांनाच नव्हे तर घटनात्मक मूल्यांनाही शिक्षा होत असल्याचे मत सुप्रीम कोर्टानं नोंदवत कडक टिप्पणी केली. आता भाजपच्या 12 निलंबित आमदारांच्या याचिकेवर पुढील सुनावणी 18 जानेवारी रोजी होणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

निलंबन झालेल्या आमदारांची नावे

1. गिरीश महाजन (Girish Mahajan), जामनेर, जळगाव

2. आशिष शेलार (Ashish Shelar), वांद्रे पश्चिम

3. डॉ. संजय कुटे (Dr. Sanjay Kute), जळगाव जामोद

4. अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar), औसा, लातूर

5. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), कांदिवली पूर्व, मुंबई

6. पराग अळवणी (Parag Alvani), विलेपार्ले, मुंबई

7. राम सातपुते (Ram Satpute), माळशिरस, सोलापूर

8. हरीश पिंपळे (Harish Pimple), मूर्तिजापुर, अकोला

9. जयकुमार रावल (Jayakumar Rawal), सिंदखेडा, धुळे

10. योगेश सागर (Yogesh Sagar), चारकोप, मुंबई

11. कीर्तिकुमार भांगडिया (Kirtikumar Bhangdiya), चिमूर, चंद्रपूर

12. नारायण कुचे (Narayan Kuche), बदनापूर, जालना

 

हे देखील वाचा :

Pune Corporation Order | पुणे महापालिकेचे आदेश ! बांधकामे व कुलींग टॉवर्ससाठी प्रक्रिया केलेले मैलापाणी वापरणे बंधनकारक

कायदेशीर आदेशाचा बागुलबुवा उभा करून PMPML संचालकांनी स्वत:चे अपयश झाकले; संचालक मंडळाचा ‘तो’ निर्णय संशयाच्या भोवर्‍यात

Solapur Crime | पोलीस निरीक्षकावर पुण्यानंतर सोलापूरमध्ये विनयभंगाचा दुसरा गुन्हा दाखल

 

Related Posts