IMPIMP

Supriya Sule-Ajit Pawar | अजित दादांना देहूत बोलावू नका, खा. सुप्रिया ताई असं का म्हणाल्या ?

by nagesh
Supriya Sule-Ajit Pawar | mp supriya sule a visit to dehu talking about ajit pawar NCP MLA Sunil Shelke

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – Supriya Sule-Ajit Pawar | देहू (Dehu News) विकास आराखड्याची पाहणी करताना कचऱ्याचं साम्राज्य राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंच्या (MP Supriya Sule) नजरेस आलं. हीच बाब भाषणावेळी त्यांनी नमूद करत नाराजी व्यक्त केली आहे. देहूकरांनी आपल्यावर विश्वास दाखवत नगरपंचायत (Dehu Nagar Panchayat) एकहाती सत्ता दिली आहे, तेंव्हा स्वच्छता राखा असंही सुळे यांनी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी चक्क अजित दादांना (Ajit Pawar) देहूमध्ये बोलावू नका, असा सल्ला मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांना दिला आहे. (Supriya Sule-Ajit Pawar)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्यावेळी बोलताना सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) म्हणाल्या, ”तुम्हाला कधी स्वच्छतेचं ऑडिट करायचं असेल तर या महाराष्ट्रात एकमेव माणूस आहे ते म्हणजे आमचे जेष्ठ बंधू अजित दादा. त्यांना एक दिवस सकाळी बोलावून घ्या, ते सुनील अण्णाची फुल परेड करून टाकतील. सुनील इथे कचरा कसा ? तिथं कचरा कसा ? वैतागून सुनील हात जोडेल अन म्हणेल मीच झाडू घेऊन स्वच्छता करतो बाबा, असं म्हणताच उपस्थितांच्या हशा पिकला. त्यामुळे दादांना वर्षभर देहूत बोलावू नका नाहीतर सर्वांवर फायरिंग होईल.” असं त्यांनी म्हटलं आहे. (Supriya Sule-Ajit Pawar)

 

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”मी पण लगेच काय तुमची चाडी करणार नाही, काही महिने जाऊदेत.
मी पण 2-3 वेळा येते, आपण स्वच्छतेसाठी कंबर कसूयात. पण त्याआधी एक काम करा.
सरकार वृक्षारोपण करेलच, पण प्रत्येक कुटुंबावर एका-एका झाडाची जबाबदारी द्या.
याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांपासून करा,” असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे.

 

Web Title :- Supriya Sule-Ajit Pawar | mp supriya sule a visit to dehu talking about ajit pawar NCP MLA Sunil Shelke

 

हे देखील वाचा :

Loan for Land Purchase | जमीन खरेदी करण्यासाठी मदत करते Land Loan, कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या आवश्यक गोष्टी

Pune Crime | माथाडी कामगाराला खंडणीसाठी मारहाण, प्रत्येक गाडीमागे 15 हजार रुपयाची मागणी; तिघांवर FIR

Rajesh Tope | ‘तिसऱ्या लाटेचा उच्चांक येऊन गेला’ ! राजेश टोपे म्हणाले – ‘नवीन व्हेरियंट अजून…’

 

Related Posts