IMPIMP

Supriya Sule To Brahman Mahasangh | अमोल मिटकरींच्या विधानाने आक्रमक झालेल्या ब्राह्मण समाजाला खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, – ‘तुम्ही वाईट वाटून घेऊ नका’

by nagesh
Supriya Sule To Brahman Mahasangh | NCP MLA Amol Mitkari Brahmin Mahasangh MP Supriya Sule Pandharpur

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Supriya Sule To Brahman Mahasangh | राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी सांगलीतील (Sangli) एका कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या विधानामुळे राज्यात ब्राह्मण महासंघ (Brahman Mahasangh) आक्रमक झाल्याचे दिसते. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. पुण्यातही ब्राह्मण समाजाने आक्रमक होत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर (Pune NCP Office) जोरदार आंदोलने केली. यानंतर आता अमोल मिटकरींवर कारवाई करण्याची मागणी पंढरपूर ब्राह्मण संघानी (Pandharpur Brahman Mahasangh) खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे. (Supriya Sule To Brahman Mahasangh)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

खा. सुप्रिया सुळे या पंढरपूर दौऱ्यावर आहेत. श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर ब्राह्मण समाजबांधवानी त्यांची भेट घेतली. अमोल मिटकरी हे सातत्याने वादग्रस्त विधान करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सांगली येथील त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. तसेच पक्षाने त्याच्यावर कारवाई करावी. त्याचबरोबर आमचं काही चुकीचं असेल तर सांगा, पण काही लोकं सतत जाणीपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, आपण कारवाई करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आली. (Supriya Sule To Brahman Mahasangh)

 

त्यावेळी बोलताना खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”मी व्हिडिओ पाहिला नाही, ऐकला नाही, वाचलेलंही नाही, मी माहिती काढते.
त्यानंतर, मी जयंत पाटील यांच्याशी बोलते,” असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
मॅडम, आपण एखादं ट्विट करा, तुमच्या ट्विटला सगळे फॉलो करतात, असं देखील एकत्रित आलेल्या समाजबांधवांनी त्यावेळी म्हटलं. त्यावेळी, ”जर तुम्ही दुखावले गेले असाल तर मी माहिती काढते आणि त्याला सांगते की तुम्ही दुखावले गेले आहात, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका,” असं खा. सुळे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Supriya Sule To Brahman Mahasangh | NCP MLA Amol Mitkari Brahmin Mahasangh MP Supriya Sule Pandharpur

 

हे देखील वाचा :

Diabetes Cure | डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी नाश्त्यात करा ‘या’ पानांचे सेवन, जाणून घ्या फायदे

Maharashtra New Rules For Bullock Cart Race | बैलगाडा मालक आणि आयोजकांसाठी महत्त्वाची बातमी; ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर !

Pune Crime | लोणावळ्यातल्या टायगर पॉइंटजवळ पर्यटकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक

 

Related Posts