IMPIMP

Sushma Andhare | ‘भाजप माझी हत्या करणार आहे का?’ – सुषमा अंधारे

by nagesh
Sushma Andhare

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   Sushma Andhare | शिवसेनेची सध्या राज्यात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. या यात्रेत सुषमा अंधारे भाजप आणि शिंदे गटावर टीकेचा भडीमार करत आहेत. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटदेखील त्यांच्या यात्रेवर टीका करत आहेत. त्यांच्या टीकेवर बोलताना अंधारे म्हणाल्या, मी माझे काम आणि महाप्रबोधन यात्रा सुरू राहील. तुम्हाला माझी भरचौकात हत्या करायची आहे का, करा. पण तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. (Sushma Andhare)

 

महाप्रबोधन यात्रेनिमित्त कल्याण पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेपूर्वी अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला लक्ष्य केले होते. त्यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निकालावरदेखील भाष्य केले होते. गुजरातच्या जनतेला महाराष्ट्राने एवढे उद्योग भेट दिलेले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या जनतेला खूश करण्यासाठी उपयोगी पडले असतील, तर चांगली गोष्ट आहे, असे म्हणत त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. माझी एक पद्धत आहे. इलाका तुम्हारा, धमाका हमारा. धाराशिवमध्ये मला पत्रकारांनी चर्चेतून प्रश्न विचारला. राऊतांनंतर आता सुषमा अंधारेंचा नंबर आहे, अशी चर्चा आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यावर, कशासाठी नंबर असेल माझा, माझ्यासाठी ईडी लावता येत नसेल,
तर मग माझ्यावर खोट्या केसेस टाकल्या जाणार आहेत का, काय केले जाणार आहे माझे?
माझा तुम्ही घातपात घडवून आणणार आहात का? तुम्हाला जे करायचे आहे ते करा.
माझी तुम्ही भरचौकात हत्या करणार आहात का? असेही सुषमा अंधारे यांनी विचारले. (Sushma Andhare)

 

Web Title :- Sushma Andhare | do you want to kill me in chowk or road sushma andharens direct warning to bjp

 

हे देखील वाचा :

SPPU News | पुणे विद्यापीठात भोजनासाठी विद्यार्थ्यांना जादा पैसे मोजावे लागणार

Pune News | ‘पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून; जी २० परिषदेत यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होतील’ – खासदार विनय सहस्त्रबुद्धे

Team India Schedule | बीसीसीआयकडून श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या होम सीरिजचे वेळापत्रक जाहीर

 

Related Posts