IMPIMP

T20 World Cup | आता खेळाडू होणार मालामाल! ICC कडून बक्षिसांची आकडेवारी जाहीर

by nagesh
T20 World Cup | prize money released by icc know how much rupees the winning team will get t20 world cup india virat kohli rohit sharma rahul dravid

सरकारसत्ता ऑनलाइन –  ICC कडून पुरुष T-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) साठीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच
T-20 विश्वचषक 2022 हा ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणार आहे. या वर्ल्डकपसाठी प्रत्येक संघाने जय्यत तयारी केली आहे. यावर्षीच्या T-20
विश्वचषक 2022  स्पर्धेत एकूण 16 संघ भाग घेणार आहेत. ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून मोठी रक्कम देण्यात येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोणत्या संघाला किती रुपये मिळणार?



यंदा T-20 विश्वचषक 2022 चे (T20 World Cup) विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला 1.6 मिलियन यूएस डॉलर म्हणजेच जवळपास 13 कोटी 4 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तर अंतिम फेरीमध्ये हरणाऱ्या संघाला 8 लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास 6 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच सेमी फायनलला पोहोचणाऱ्या संघांनाही 4 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 3 कोटी 25 लाख रुपये मिळणार आहे. या स्पर्धेसाठीची एकूण 5.6 मिलियन डॉलर म्हणजेच 46 कोटी रुपये देण्यात येणार आहे.

 

याचबरोबर सुपर-12 मधून बाहेर पडलेल्या आठ संघांना प्रत्येकी 70 हजार डॉलर म्हणजेच 57 लाख रुपये देण्यात येणार आहे.
मागच्या वर्षीप्रमाणेच सुपर-12 मधील प्रत्येक सामन्यांमध्ये विजय मिळवणाऱ्या संघाला 40 हजार डॉलर्स म्हणजेच 32 लाख 53 हजार रुपये देण्यात येतील.
या स्पर्धेमध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या आठ संघांनी सुपर-12 मध्ये स्थान मिळवले आहे.
मागच्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजेतेपद पटकावले होते.

 

 

Web Title :- T20 World Cup | prize money released by icc know how much rupees the winning team will get t20 world cup india virat kohli rohit sharma rahul dravid

 

हे देखील वाचा :

Shanikrupa Heartcare Centre | नातं हृदयाशी : हृदयविकारांच्या विनाशस्रक्रिया तपासण्या आणि इतर चाचण्यासह विनाशस्रक्रिया उपचारासाठी भारतातील अद्ययावत प्रिव्हेटिंव्ह कार्डिओलॅाजी सेंटर शनिकृपा हार्टकेअर सेंटर

Pune Crime | कात्रज परिसरात गुंडाकडून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, कोयत्याने सपासप वार

Pune Crime | गरिबीमुळे आईनं मोबाईल घेऊन दिला नाही, नाराज मुलाने उचललं टोकाचं पाऊल; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Jasprit Bumrah | “जसप्रीत बुमराह फेरारी आहे, रोज चालणारी टोयोटा कार नाही”, PAK च्या माजी कर्णधाराने बुमराहवर टीका करणाऱ्यांना सुनावले

Mohammad Rizwan | मोहम्मद रिझवानने रचला विक्रम, अशी कामगिरी करणारा पाकिस्तानचा पहिलाच क्रिकेटपटू

 

Related Posts