IMPIMP

TET Exam 2021 | TET परीक्षेस 90 टक्के उमेदवारांची उपस्थिती; 8 हजार विद्यार्थी ‘डुप्लिकेट’?

by nagesh
TET Exam 2021 | 8 thousand duplicates tet exam 90 percent student attended exam marathi news policenama

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  TET Exam 2021 | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गतवर्षी टीईटी परीक्षा घेतली गेली नाही. त्यामुळे यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली दिसून आलीय. शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam 2021) रविवारी (21 ऑक्टोबर) रोजी पार पडली आहे. टीईटी परीक्षेसाठी एकूण नोंदणीच्या 88 ते 90 टक्के विद्यार्थी परीक्षेस बसले होते. दरम्यान, मुख्यता: म्हणजे जवळपास आठ हजार डुप्लिकेट विद्यार्थ्यांनी (Duplicate students) नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

टीईटी परीक्षेच्या पहिल्या सत्रात कोल्हापूर, नाशिक औरंगाबाद आणि धुळे जिल्ह्यांत काही ठिकाणी परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं.
तर, परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा 2013 पासून घेतली जात असून 21 नोव्हेंबर 2021 (TET Exam 2021) रोजी सातवी टीईटी परीक्षा घेण्यात आली आहे.
तसेच, यापूर्वी 19 जानेवारी 2020 रोजी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेस 3 लाख 43 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

 

टीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थ्यांनी 2 ते 3 वेळा ऑनलाईन अर्ज भरला होता.
अशा विद्यार्थ्यांचा फक्त एकच अर्ज गृहित धरण्यात आला आहे.
एकापेक्षा अधिक वेळा अर्ज भरणाऱ्या या ‘डुप्लिकेट’ विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 8 हजार होती.
त्यामुळे या प्रत्येक विद्यार्थ्याशी संपर्क साधून त्यांचा फक्त एकच अर्ज ग्राह्य धरण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, TET परीक्षेचा निकाल दीड महिन्यात जाहीर करण्याचा प्रयत्न आहे.
पवित्र पोर्टलद्वारे केल्या जाणाऱ्या भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा घेतली जाते.
ही परीक्षा येत्या फेब्रुवारी अखेरीस घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तत्पूर्वी, टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

 

Web Title : TET Exam 2021 | 8 thousand duplicates tet exam 90 percent student attended exam marathi news policenama

 

 

हे देखील वाचा :

MLA Gopichand Padalkar | पडळकरांचा अनिल परबांना सवाल; म्हणाले – ‘आझाद मैदानावर काय अतिरेकी बसलेत का?’

Parth Pawar | गाववाला व बाहेरचा वाद उभा करुन लोकांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण थांबवा; पार्थ पवारांनी सत्ताधाऱ्यांना सल्ला

Legislative Council By-Election | विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव बिनविरोध

 

Related Posts