IMPIMP

Thane ACB Trap | विद्यार्थ्यांकडून लाच घेणाऱ्या तंत्रशिक्षण विभागातील मोठा अधिकारी, महिला प्राचार्यासह चारजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन  ठाणे जिल्ह्यातील आर्किटेक्चर कॉलेजमध्ये (College of Architecture) विद्यार्थ्यांना प्रवेश (students Admission) देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी (Accepting Bribe) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Thane ACB Trap) राज्य शासनाच्या बांद्रा येथील तांत्रिक व सह संचालक विभागीय कार्यालयातील(Technical and Joint Director Divisional Office) सहायक संचालकासह (Assistant Director) महिला प्राचार्य (Female Principal), कार्यालयीन अधिक्षक (Office Superintendent), वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) यांना अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.28) करण्यात आली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी (Thane ACB Trap) अटक केलेल्यांकडून 3 लाख 15 रुपये रोख जप्त केले आहेत. जे त्यांनी या प्रकरणातील तक्रारदारासह 11 विद्यार्थ्यांकडून गोळा केले होते. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सहायक संचालक, तांत्रिक व सह संचालक विभागिय कार्यालय बांद्रा जितेंद्र रामदासजी निखाडे Jitendra Ramdasji Nikhade (वय-54), के.एल. तिवारी, आर्किटेक्चर कॉलेज मिरा भाईदर (K.L. Tiwari, College of Architecture, Mira Bhaidar) येथील प्राचार्य रुपाली हितेंद्र गुप्ते Principal Rupali Hitendra Gupte (वय-40), कॉलेजचे कार्यालयीन अधिक्षक संतोष रंगराव हुबाले Santosh Rangrao Hubale (वय-45), वरिष्ठ लिपिक श्रेया संतोष बने Shreya Santhosh Bane (वय-46) असे लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध मीरा रोड पोलीस ठाण्यात (Mira Road Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

तक्रारदार यांची मुलगी आर्किटेक्चर कॉलेजमध्ये शिकत होती, ती शिकत असलेले अस्मिता कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (Asmita College of Architecture) ही शैक्षणिक संस्था बंद पडली.
के एल तिवारी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आणि विषय बदलण्याची परवानगी देण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य रुपाली गुप्ते यांनी 30 हजार रुपयांची मागणी केली.

 

प्राध्यापक गुप्ते यांनी तक्रारदाराला हे पैसे कार्यालयीन अधीक्षक संतोष हुबाले यांच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानुसार तक्रारदार हे हुबळे यांना भेटले असता त्यांनी तंत्रशिक्षण सहसंचालकांना देण्यासाठी 30 हजार रुपयांची मागणी केली.
त्यानंतर तक्रारदाराने ठाणे एसीबी यांच्याकडे तक्रार केली.
तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणेने (Thane ACB Trap) बुधवारी महाविद्यालयाच्या कार्यालयात
सापळा रचून तक्रारदाराकडून अधीक्षक व प्राध्यापकाच्या वतीने 15 हजार रुपये लाच घेताना वरिष्ठ लिपिक श्रेया बने यांना रंगेहाथ पकडले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कारवाई दरम्यान राजेंद्र निखाडे यांनी संस्था व अभ्यासक्र बदलाबाबत सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय
मार्फत परवानगी मिळवुन देण्यासाठी लाचेची रक्कम स्विकारण्यास दुजोरा देऊन संमती दाखवली.
कारवाई दरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम बदलण्यासाठी आणि संस्था बदलासाठी प्रत्येक
विद्यार्थ्याकडून 30 हजार रुपये याप्रमाणे 14 विद्यार्थ्यांकडून 4 लाख 20 हजार रुपये लाच
मागितल्याचे समोर आले.
तर 10 विद्यार्थ्यांचे प्रत्येकी 30 हजार प्रमाणे 3 लाख आणि तक्रारदार यांच्याकडून स्विकारलेले 15 हजार
असे एकूण 3 लाख 15 रुपये आणि विद्यार्थ्यांच्या नावाची यादी ठाणे एसीबीच्या पथकाने जप्त केली आहे.
ठाणे एसीबीने सहायक संचालक निखाडे यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेतले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले (SP Punjabrao Ugale),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar) यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पथकाने केली.

 

 

Web Title :- Thane ACB Trap | Senior official of technical education department who took bribe from students, four people including female principal in anti-corruption

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पेट्रोलची नशा? 5 अल्पवयीन मुलांकडून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, सिंहगड रोड परिसरातील घटना

Bug In Whatsapp | व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलेल्या धोकादायक बग बाबत CERT ने जारी केला अलर्ट, डाटा लीक होण्याचा धोका

Pune Crime | मुलाकडून आईच्या खूनाचा प्रयत्न, लोणीकाळभोर परिसरातील घटना

 

Related Posts