IMPIMP

The Kashmir Files | ‘काश्मीर फाईल्स’ पाहून आल्यानंतर तरुणाचा ‘ब्रेन स्ट्रोक’ने मृत्यू, पुण्यातील धक्कादायक प्रकार

by nagesh
The Kashmir Files | shocking incident in pimpri brain stroke to youth after seeing kashmir files death of a young man in pimpri chinchwad of pune

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनकाश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपट पाहून आल्यानंतर एका तरुणाचा ब्रेन स्ट्रोकने (Brain Stroke) मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात घडली आहे. हा तरुण कट्टर हिंदुत्ववादी (Hardcore pro-Hindu) विचारसरणीचा (Ideology) होता. अभिजित शशिकांत शिंदे Abhijit Shashikant Shinde (वय-38 रा. लिंकरोड, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.27) चिंचवड येथे घडली आहे. अभिजीत याने 21 मार्च रोजी काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपट पाहिला होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित शिंदे हा कट्टर हिंदुत्ववादी विचारसणीचा तरुण होता. लहानपणापासून त्याच्यावर हिंदुत्ववादी संघटनांचा प्रभाव होता. 21 मार्च रोजी त्याने मित्रांसोबत काश्मिर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर त्याने मित्रांसोबत तासभर याबाबत चर्चा केली. यानंतर तो कोणाशीही न बोलता खोलीत झोपण्यासाठी गेला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास अभिजितला ब्रेन स्ट्रोक आला.

 

मेंदूला रक्तपुरवठा (Blood Supply) करणाऱ्या रक्तवाहिन्या (Blood Vessels) फुटल्याने अभिजित बेशुद्ध पडला.
सकाळी त्याचे वडिल खोलीत गेले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने अभिजितला एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
त्याच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु असताना रविवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तो अतिशय संवेदनशील असल्याने अलिकडेच त्याला उच्च रक्तदाबाची समस्या जाणवत होती, असे नातेवाईकांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत अभिजितचे वडिल शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, काश्मीर फाईल चित्रपट पाहून आल्यानंतर अभिजितला ब्रेन स्ट्रोक आला
याबाबत अनेकांनी माझ्याकडे चौकशी केली. मी चित्रपट चुकीचा आहे, असे म्हणणार नाही.
तरुणांनी कोणताही चित्रपट पाहताना त्या चित्रपटामधून चांगला बोध घेणे आवश्यक आहे.
संवेदनशील व्यक्तींनी अशा प्रकारचे चित्रपट पाहताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

 

 

Web Title :- The Kashmir Files | shocking incident in pimpri brain stroke to youth after seeing kashmir files death of a young man in pimpri chinchwad of pune

 

हे देखील वाचा :

Tata Group | TATA च्या ‘या’ शेयरने दिला 25,000% रिटर्न, 35 चा शेयर आता 9,000 रुपयांच्या पुढे

Shehnaaz Kaur Gill Magazine Photoshoot | सोफ्यावर बसून शहनाज कौर गिल झाली अधिकच बोल्ड, केलं मॅगझीनसाठी सिझलिंग फोटोशूट..

Pune Crime | Facebook वर मैत्री व त्या मैत्रीत…! बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

 

Related Posts