IMPIMP

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या विश्वासू सहकार्‍याची भाजपाशी सलगी, नार्वेकर म्हणतात, ‘अमित शाहजी देव करो तुम्हाला…’

by nagesh
Maharashtra Karnataka Border Dispute | uddhav thackeray declare karnataka occupied maharashtra union territory till court decision uddhav thackeray demand in legislative council

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकएक शिलेदार सोडून जात असताना काही दिवसांपूर्वी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे सुद्धा शिंदे गटात (Shinde Group) जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यावर शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. यानंतर नार्वेकर थेट मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) निवडणुकीत शिंदे, फडणवीस, पवार यांच्यासोबत दिसले होते. या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. आता नार्वेकर यांनी थेट भाजपा नेते अमित शाह (BJP leader Amit Shah) यांना एक ट्विट केले आहे. ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. (Uddhav Thackeray)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त इंग्रजीमध्ये एक ट्विट केले असून यात म्हटले आहे की, माननीय गृहमंत्री श्री अमित शाहजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! देव करो तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो.

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी समजले जणारे मिलिंद नार्वेकर हे कधीही अशाप्रकारे वैयक्तिक शुभेच्छा देताना किंवा राजकारण करताना दिसले नव्हते. आज त्यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका करत आहेत तर दुसरीकडे त्यांचा राईट हँड समजले जाणारे मिलिंद नार्वेकर वैयक्तिकरित्या अमित शाह यांना शुभेच्छा देत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटले आहे.

 

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar)
आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या पॅनलने विजय मिळवला.
या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर नार्वेकर यांनी म्हटले होते की, उद्धव साहेब आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उमेदवार
हो म्हणून परवानगी दिली, त्याच्या नंतर पवार साहेबांनी मंजुरी दिली, शेलार साहेबांनी दिली, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
यांनी सभा घेतल्या, असे म्हणत नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | maharashtra political crisis shivsena uddhav thackeray right hand milind narvekar tweets to wish bjp amit shah on birthday

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दुसरीकडे पानटपरी लावल्याने जातीवाचक शिवीगाळ करणार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Rain in Maharashtra | दिवाळीवर पावसाचे सावट; परतीचा पाऊस लांबला

Pune Crime | दिवाळीच्या स्टॉलसाठी फिडरमधुन वीज घेण्याचा प्रयत्न करताना तरुणाचा मृत्यू

 

Related Posts