IMPIMP

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांचे पत्रातून निवडणूक आयोगावर 12 बाण

by nagesh
Maha Vikas Aghadi | maharashtra karnataka border dispute mahavikas aghadi uddhav thackeray ajit pawar nana patole

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेत मोठे बंड झाल्याने दोन गट पडले. यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाने तर थेट मूळ पक्ष शिवसेनेवर (Shivsena) दावा केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि केंद्रीय निवडणूक आयोगात (Central Election Commission) अनेक याचिका प्रलंबित आहेत. त्यातच आता अंधेरी पूर्व येथे पोटनिवडणुका (Andheri East By-Election) होणार आहेत. त्यासाठी दोनही गटाचे उमेदवार रिंगणात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी आयोगाने अंतरीम निर्णय देत दोनही गटांना वेगळी नावे आणि निवडणुकीसाठी चिन्हांचे वाटप केले आहे. त्यावर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नारजी व्यक्त केली आहे. ठाकरेंनी आयोगाच्या निर्णयावर पत्र लिहून त्यांच्या कामकाजावर प्रश्वचिन्ह उपस्थित केले आहे. चिन्ह वाटप करताना विरुद्ध बाजूला झुकते माप दिल्याचा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाने केला आहे.

 

याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोग ठाकरे गटासोबत दुय्यम वागणूक देत असल्याचे देखील ठाकरे यांनी पत्रात म्हंटले आहे. सदर पत्रात 12 मुद्यांखाली निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयात कशा प्रकारे पक्षपात झाला हे स्पष्ट केले आहे. यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने आयोगाच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. आणि आयोग आमच्यासोबत पक्षपात करत असल्याचे म्हंटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

केंद्रीय निवडणूक आयोग शिंदे यांच्या गटाला प्राध्यान्य देत आहे. वारंवार सूचना करुन देखील शिंदे यांचा गट कागदपत्रे सादर करत नाही. आम्ही दिलेली कागदपत्रे शिंदे यांच्या गटाला दिली जातात, पण त्यांची कागदपत्रे आम्हाला मिळत नाहीत. त्यामुळे आमची रणनीती आयोग उघड करत असल्याचा आरोप ठाकरे यांच्या गटाने केला आहे.

 

चिन्हासाठी आम्ही दिलेले पर्याय जाणून बुजून वेबसाईटवर टाकण्यात आले.
त्यामुळे शिंदे यांच्या गटाने देखील सारखेच पर्याय दिले. अंधेरीतील पोटनिवडणुकीसाठी आमचे चिन्ह आणि नाव गोठविण्यात आले.
परंतु शिंदे यांचा गट निवडणूक लढवित नाही, तरी देखील आमचे चिन्ह गोठविण्यात आल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray group serious allegations on election commission

 

हे देखील वाचा :

Pune Motor Driving School | महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलला पुन्हा एकदा ‘अ’ दर्जा गुणवत्ता मानांकन

Cricket Match Fixing Case | क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी ‘या’ खेळाडूवर 14 वर्षांची बंदी

Pune Crime | महापालिका परीक्षेत इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसद्वारे कॉपी करणारा अटकेत

Andheri By-Election | अंधेरी पोटनिवडणुक : शिवसेनेत गैरसमज पसरवण्याची मनसेची खेळी, म्हणाले – ‘ऋतुजा लटकेंचा राजीनामा लटकवण्याचा अनिल परबांचा डाव’

 

Related Posts