IMPIMP

Pune Motor Driving School | महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलला पुन्हा एकदा ‘अ’ दर्जा गुणवत्ता मानांकन

by nagesh
Pune Motor Driving School | Mahesh Motor Driving School has once again been awarded 'A' grade quality rating

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  राज्याच्या परिवहन विभागाच्या (State Transport Department) आदेशानुसार नुकतेच राज्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी (Pune Motor Driving School) करून त्यांचे मूल्यांकन करण्यात आले. या मध्ये पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (Pune RTO) नुकत्याच झालेल्या मोटार ड्रायव्हिंग स्कूल च्या तपासणी (Pune Motor Driving School) मध्ये महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल ला (Mahesh Motor Driving School) पुन्हा एकदा ‘अ’ दर्जा गुणवत्ता मानांकन मिळाले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

“अ”दर्जा प्राप्त मोटार ड्रायव्हिंग स्कूल  संचालकांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे (Regional Transport Officer Dr. Ajit Shinde) यांचे मार्गदर्शनाखाली कार्यालयात प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक शशांक शिळीमकर (Shashank Shilimkar) व महेश शिळीमकर (Mahesh Shilimkar) यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर (Deputy Regional Transport Officer Sanjeev Bhor), सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र पाटील (Assistant Regional Transport Officer Rajendra Patil), युवराज पाटील (Yuvraj Patil), अनंत भोसले (Anant Bhosale), सुजित डोंगरजाळ (Sujit Dongarjal) व सहायक मोटार वाहन निरीक्षक सुचित्रा पाटील (Assistant Motor Vehicle Inspector Suchitra Patil) आदि उपस्थित होते.

 

या विषयी बोलताना महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक महेश शिळीमकर म्हणाले, प्रादेशिक परिवहन कार्यालय,
पुणे अंतर्गत नोंद असलेल्या मोटार ड्राईविंग स्कूलची गुणांकन तपासणी करण्यात आली या तपासणी मध्ये
मोजक्याच मोटार ड्रायव्हिंग स्कूल ‘अ’ दर्जा मानांकन प्राप्त करू शकल्या.
यापूर्वी झालेल्या गुणवत्ता तपासणी मध्ये ही महेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल ला ‘अ’ दर्जा मानांकन मिळाले होते.
मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने चालकांना दिले जाणारे प्रशिक्षण, स्कूल मधील उपलब्ध वाहने आणि
इतर साधनांचा दर्जा, जागेची उपलब्धता, प्रशिक्षणातील आधुनिकता, प्रशिक्षक, विद्यार्थ्यांचा फीडबॅक,
रस्ता सुरक्षा जनजागृती आदि बाबतची तपासणी केल्या नंतर परिवहन विभागाने सदरील ‘अ’ दर्जा मानांकन आम्हाला दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Motor Driving School | Mahesh Motor Driving School has once again been awarded ‘A’ grade quality rating

 

हे देखील वाचा :

Cricket Match Fixing Case | क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी ‘या’ खेळाडूवर 14 वर्षांची बंदी

Pune Crime | महापालिका परीक्षेत इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसद्वारे कॉपी करणारा अटकेत

Andheri By-Election | अंधेरी पोटनिवडणुक : शिवसेनेत गैरसमज पसरवण्याची मनसेची खेळी, म्हणाले – ‘ऋतुजा लटकेंचा राजीनामा लटकवण्याचा अनिल परबांचा डाव’

 

Related Posts