IMPIMP

Uddhav Thackeray | ठाण्यातील प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात; म्हणाले – ‘फडणवीस फडतूस, गृहमंत्री नव्हे तर हे तर गुंडमंत्री’ (व्हडिओ)

by nagesh
 Devendra Fadnavis | who exactly told you that oppose barsu refinery devendra fadnavis question to uddhav thackeray

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – एक फडतूस गृहमंत्री (Home Minister) राज्याला मिळाला आहे. उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून लाचारी, लाळघोटेपणा करणारी व्यक्ती फडणविसी करत आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर घणाघात केला. सोमवारी रात्री ठाकरे गटाच्या (Thackeray Group) महिला पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shinde Beating Case) यांना शिवसेनेच्या (Shivsena) महिलांनी मारहाण केली. रोशनी शिंदे यांची आज रुग्णालयात जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबाने भेट घेतली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), खासदार राजन विचारे (MP Rajan Vichare), ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) यांनी पोलीस आयुक्तांची (Mumbai Police CP) भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुक्त कार्यालयात नसल्याने याप्रकरणावर चर्चा होऊ शकली नाही. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला संताप व्यक्त केला.

 

उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सरकार नपुंसक असल्याचे म्हटले होते. त्याची प्रचिती ठाण्यात आली. एका महिलेला मारहाण करण्यात आली. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. इतकंच काय या पीडित महिलेची तक्रार दाखल करुन घेतली नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

 

 

फडणवीसांवर घणाघात

एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हालायला तयार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघात केला.

 

 

गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, यांची गुंडगिरी वाढत चालली आहे. ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जात आहे. त्या महिलेला आम्ही भेटलो. त्या म्हणतात की त्यांनी कोणतीही कमेंट केली नाही. त्यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडिओ करुन घेतला. तोही त्यांनी दिला. तरी आणखीन महिलांना बोलावून मारहाण केली. मला वाटत फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात ठाकरेंनी फडणवीसांवर प्रहार केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री

फडणवीस यांच्या घरावर काही आलं तर लगेच एसआयटी नेमली जाते. बाजूच्या राज्यात जाऊन अटक केली जाते.
त्यांच्या पक्षातल्या लोकांवर मिंधे गटाकडून हल्ले झाले, तर तिथे फडणविसी दाखवण्याची त्यांची हिंमत नाही.
एकूणच गुंडगिरीचं राज्य आहे. त्यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं हे लोक ठरवतील. त्यांनी जाहीर करावं, मंत्रिमंडळाच्या विस्तारात (Cabinet Expansion) एक खातं निर्माण करावं आणि गुंडमंत्री अस पद निर्माण करुन गुंड पोसण्याचं काम त्या मंत्र्याकडं द्याव, असा खोचक सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला.

 

 

आयुक्तांची बदली करा

मी पुन्हा सांगतोय की, शिवसैनिक शांत आहेत म्हणजे तुमच्यासारखे नपुंसक नाहीत.
मनात आणलं तर ठाण्यातून मुळासकट उखडून टाकतील असे शिवसैनिक आणि नागरिक आहेत.
ताबडतोब गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा लोक तुमच्यावर थुंकतील.
थोडी लाज, लज्जा शरम असेल तर बिनकामाच्या आयुक्तांची बदली करा किंवा निलंबित करा.
ठाण्याला कणखर आयुक्त द्या. अद्याप साधा एफआयआरही (FIR) दाखल झालेला नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray slams devendra fadnavis on thane woman beaten up shinde fraction

 

हे देखील वाचा :

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! माणिकचंद ऑक्सिरीच बाद फेरीत; संदीप हिरोज् संघाची विजयी सलामी

Sinhagad Fort-Regional Tourism Scheme | प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सिंहगड परिसर संवर्धनासाठी 3 कोटी 75 लाख मंजूर

Roshni Shinde | ‘गुंडगिरी करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का?’, मारहाण झालेल्या रोशनी शिंदेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

 

Related Posts