IMPIMP

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | धनुष्यबाण वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

by nagesh
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | shivsena chief uddhav thackeray demands election commission do not take any decision regarding bow and arrow logo without knowing us

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | चाळीस आमदारांना घेऊन बंडखोरी करणारे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आता शिवसेना पक्षावर हक्क सांगण्यास सुरूवात केली आहे. भविष्यात पक्षचिन्हाचा वादही उभा राहू शकतो, याची जाणीव झाल्याने शिवसेना सावध झाली आहे. यासाठीच खबरदारी म्हणून शिवसेनेने धनुष्यबाण वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. (Uddhav Thackeray Vs Eknath Shinde)

 

शिवसेनेने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे की, आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय धनुष्यबाण या चिन्हाविषयी कोणताही निर्णय घेऊ नये. या संदर्भात शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक कॅव्हेट दाखल केले आहे. आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी केली आहे.

 

राज्यात संत्तासंघर्षाच्या अनेक घडामोडी घडत असताना शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा केला आहे.
आगामी काळात शिंदे गटाकडून शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरदेखील दावा केला जाण्याची शक्यता आहे.
म्हणूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल करून वरील मागणी केली आहे.

 

निवडणूक आयोग शिवसेनेच्या कॅव्हेटवर कोणते उत्तर देते हे आगामी काळात महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवसेनेपासून धनुष्यबाण हे चिन्ह कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही
असे म्हणत असले तरी शिंदे गट भाजपाच्या सोबत असल्याने ते काहीही करू शकतात, याची जाणीव शिवसेनेला झाली असल्याचे दिसत आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | shivsena chief uddhav thackeray demands election commission do not take any decision regarding bow and arrow logo without knowing us

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हेदेखीलवाचा:

Dengue Patients-Pune Corona | शहरात कोरोनासोबतच डेंग्युच्या रुग्णांच्या संख्येत वाढ ! डेंग्यु रोखण्यसाठी नागरिकांनी स्वत:च्या घरापासून काळजी घ्यावी; महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आवाहन

Raja Mane | राजा माने यांना सुधारककार आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Maharashtra Political Crisis | बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या; राष्ट्रवादीचा सल्ला

Related Posts