IMPIMP

Maharashtra Political Crisis | बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या; राष्ट्रवादीचा सल्ला

by nagesh
NCP on Shivsena | the terror of mumbais thackerays is still present say ncp mla devendra bhuyar warning to shivsena
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) 16 आमदारांविरोधात अपात्रतेच्या नोटिसीनंतर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल याचिकेवर आज 11 जुलैला सुनावणी होणार होती, परंतु ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने शिंदे-फडणवीस सरकारला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सुधारित पक्षांतर बंदी कायद्यानुसार शिंदे गटाला इतर पक्षात विलिन होणे आवश्यक आहे, अन्यथा अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने (NCP) मित्रपक्षांना एक सल्ला दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी म्हटले आहे की, बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या.

 

अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, साहेब बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या. चिन्ह जवळपास तशीच दिसताहेत. एकदा का हा डाव भाजपानी साधला. तर मात्र आधुनिक मावळ्यांनी आजच्या औरंगजेबाला घाबरून त्याचे मांडलिकत्व स्विकारले असा नवा इतिहास पुढच्या पिढ्या लक्षात ठेवतील. अखंड सावध असा. (Maharashtra Political Crisis)

 

शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने शिवसेनेच्या पाठीशी ठांब उभा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तसे जाहीरपण वक्तव्य सुद्धा केले होते. यानंतर आजच खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी शिवसेनेच्या बंडखोरांवर निशाणा साधताना म्हटले होते की, मित्र पक्ष म्हणून आम्ही शिवसेनेला (Shivsena) शेवटपर्यंत साथ दिली आहे आणि यापुढेही देत राहणार. शिवसेनेचा उत्तराधिकारी कोण हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी आधीच ठरवले होते आणि बाळासाहेबांच्या आदेशाच्या वेगळे काही करणे हे बाळासाहेबांना दुखावण्याचे काम आहे.

यापूर्वीही अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपाला खोचक टोला लगावला होता.
या ट्विटमध्ये म्हटले होते की, सद्यस्थिती महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस दुसर्‍या,
चंद्रकांत पाटील तिसर्‍या तर इतर भाजप नेते चौथ्या व पुढच्या नंबरवर फेकले गेलेत.
विश्वास आहे शिंदेसाहेब भाजपची जनमानसातील उरली सुरली लोकप्रियता लवकरच संपवतील.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | ncp amol mitkari warns about eknath shinde group likely merge in bjp

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Related Posts