IMPIMP

UP Assembly Election 2022 | अयोध्येत CM योगींविरोधात शिवसेना निवडणुकीच्या मैदानात? संजय राऊत घेणार राकेत टिकैत यांची भेट

by nagesh
UP Assembly Election 2022 | election 2022 sanjay raut meet rakesh tikait shiv sena give candidate ayodhya against yogi adityanath

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन UP Assembly Election 2022 | उत्तर प्रदेशसह पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत. यामुळे पाच राज्यात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. यातच महत्वाचं राज्य मानलं जाणाऱ्या उत्तर प्रदेशात (UP Assembly Election 2022) आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला (BJP) सत्तेतून बाजुला करण्यासाठी अनेक विरोधी पक्ष आपली रणनिती आखत आहे. अशातच आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या मैदानात शिवसेनाही (Shiv Sena) उतरणार असल्याची मोठी चर्चा आहे. यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांची भेट घेणार आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काय म्हणाले संजय राऊत?
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ”शिवसेना अयोध्येत आपला उमेदवार देणार आहे. मथुरेतून प्रचाराला सुरुवात करणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या विरोधात दंड थोपटणार असल्याचे म्हटले. तर, संजय राऊत शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीबाबत त्यांचा कल जाणून घेणार आहे. त्यानंतर आम्ही कुठे लढायचे, किती जागांवर लढायचे हे ठरवणार आहोत,” असं ते म्हणाले. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांना अयोध्येतून भाजप उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. (UP Assembly Election 2022)

 

पुढे संजय राऊत म्हणाले, ”अयोध्येच्या मंदिरासाठी शिवसेनेने मोठा संघर्ष केला आहे. आम्ही त्या विषयाला चालना दिली. याचे श्रेय कुणी दुसऱ्यांनी घेऊ नये. अयोध्येत मथुरेत आम्ही निवडणूक लढवणार आहोत. दोन-चार दिवसांनी मथुरेत जाणार आहे. तसेच शिवसेनेला उत्तर प्रदेशमध्ये आपले आस्तित्व दाखवायचे आहे. मला खात्री आहे की, यावेळी आम्ही ज्या पद्धतीने लढायचे ठरवले आहे, त्यामुळे आमचे सदस्य उत्तर प्रदेश विधानसभेत असतील,” असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, ”लाटांचे तडाखे बसायला सुरूवात झाली आहे. सध्या मंद लाटा आहेत.
पण त्या उसळू शकतात व जहाज हेलकावू शकते. शिवसेना उत्तर प्रदेशात 50 जागा लढवेल.
भाजप ओपिनियन पोलच्या माध्यमातून अफवा पसरवत आहे. त्यावर विश्वास ठेवू नका.
गोवा (Goa) आणि उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) परिवर्तन निश्चित आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- UP Assembly Election 2022 | election 2022 sanjay raut meet rakesh tikait shiv sena give candidate ayodhya against yogi adityanath

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खून करुन फरार झालेल्या आरोपीच्या बिबवेवाडी पोलिसांनी तासाभरात आवळल्या मुसक्या

Covid-Free Village Contest | ‘कोविड मुक्त गाव’ स्पर्धेचे आयोजन, विजेत्याला 50 लाखांचे बक्षीस

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, वर्षभरासाठी सर्व स्कूल बसचा ‘वाहन कर’ माफ

 

Related Posts