IMPIMP

Covid-Free Village Contest | ‘कोविड मुक्त गाव’ स्पर्धेचे आयोजन, विजेत्याला 50 लाखांचे बक्षीस

by nagesh
Covid-Free Village Contest | Covid-Free Village Contest in Pune district Winner to get Rs 50 lakh award

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – Covid-Free Village Contest | ‘राज्यात कोरोनाचा हाहा:कार उडाला आहे. राज्यात दिवसेंदिवस रुग्णांच्या
संख्येत मोठी वाढ होत आहे. दरम्यान कोरोनाच्या रुग्ण संख्येला ब्रेक लावण्यासाठी एका स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. ‘कोरोना मुक्त गाव’ असे
या स्पर्धेचे (Covid Free Village Contest) नाव असून पुणे जिल्ह्यासाठी या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा पुणे जिल्ह्यात (Corona in Pune) 10 जानेवारीपासून सुरु झाली असून 15 मार्चपर्यंत चालणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Pune ZP CEO Ayush Prasad) यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनाने स्पर्धेचे स्पष्टीकरण देण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे जिल्ह्याचा (Pune District) ग्रामीण भाग (Rural Areas) कोरोना मुक्त करण्यासाठी आम्ही पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये (Gram Panchayat) ग्रामीण भागात चांगले कोविड व्यवस्थापन (Covid Management) करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही स्पर्धा जाहीर केली आहे, असे आयुष प्रसाद यांनी सांगितले. या स्पर्धेतील विजेत्याला संबंधित ग्रामपंचायतीच्या विकासासाठी निधी दिला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे सर्व ग्रामपंचायतींवर कोविडचे योग्य व्यवस्थापन आणि जनजागृती करण्यावर आमचे लक्ष असणार असल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले. (Covid-Free Village Contest)

 

विजेत्याला 50 लाखांचे बक्षीस
पुणे विभागातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तीन गावांची निवड करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून (State Government) या गावांच्या विकासासाठी रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम क्रमांकासाठी 50 लाख, द्वितीय 25 तर तृतीय क्रमांकाच्या गावाला 15 लाखांचे बक्षीस दिले जाणार असल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले.

 

Web Title :-  Covid-Free Village Contest | Covid-Free Village Contest in Pune district Winner to get Rs 50 lakh award

 

हे देखील वाचा :

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, वर्षभरासाठी सर्व स्कूल बसचा ‘वाहन कर’ माफ

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 48 वर्षीय नराधमानं तिघा अल्पवयीन मुलांना गॅरेजमध्ये नेवून केलं अनैसर्गिक कृत्य

Aadhaar Card | कोणत्या बँकेसोबत लिंक आहे तुमचे आधार कार्ड, एका क्लिकमध्ये असे घ्या जाणून

 

Related Posts