IMPIMP

Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | ‘फुरसुंगी आणि उरूळी देवाचीमध्ये बहुतांश विकासकामे झाल्याने आम्हाला महापालिकेची गरज नाही’ – माजी मंत्री विजय शिवतारे

by nagesh
Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | 'We do not need a pune municipal corporation as most of the development works are in Fursungi and Uruli Devachi' - Former Minister Vijay Shivtare

महापालिकेचा मिळकत कर नसून ‘जिझिया कर’ असल्याने फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे वगळण्याची केली होती मागणी

 

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावांमधील बहुतांश विकास कामे झाली आहेत. पुढील दोन महिन्यांत पाणी पुरवठा देखिल सुरू होईल. मात्र, महापालिकेने ग्राम पंचायतीच्या तुलनेत कैकपटीने मिळकत कर लादल्याने ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्याची आमची मागणी होती. नगरपालिकेमध्ये स्थानीक ४० नगरसेवक असतील व तेच मिळकत कर ठरवतील. या गावांतील तीनही टी.पी.स्किम आम्ही करू. या निर्णयामागे कुठलाही राजकिय अजेंडा नसल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेनेचे (Balasahebanchi Shivsena) नेते माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. (Uruli Devachi-Fursungi Nagar Palika)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे महापालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मागणीसाठी शिवतारे आग्रही होते. या निर्णयाची माहिती आज शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Uruli Devachi-Fursungi Nagar Palika)

 

शिवतारे यांनी सांगितले, की २०१७ मध्ये या परिसराचा चांगल्या पद्धतीने विकास होईल म्हणून फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील नागरिक महापालिकेत सहभागी झाले होते. परंतू मागील पाच वर्षात रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन व अन्य कुठल्याच सुविधा महापालिकेने पुरविल्या नाहीत. उलट महापालिकेने हडपसर येथील रेडीरेकनरच्या दराने या दोन्ही गावांमध्ये कर आकारणी करत थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली. ग्रामपंचायत असताना येणार्‍या करापेक्षा पालिकेच्या कराची रक्कम कैकपटीने अधिक आहे. या विरोधात महापालिका आणि राज्य शासनाकडे देखिल दाद मागण्यात आली होती. परंतू त्यांनी काहीच कारवाई न केल्याने मुख्यमंत्र्यांच्या दरबारात हा प्रश्‍न नेला. वस्तुस्थितीची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दोन्ही गावे वगळून नवीन नगरपालिका करण्याचा निर्णय घेतला.

 

पुरंदर मध्ये नवीन विमानतळ (Purander Airport) होत आहे. त्यामुळे या भागाचा विकास होईल. पहिल्याच वर्षी विकसन शुल्कातून २५० कोटी रुपये उत्पन्न मिळेल. मंत्री असताना माझ्या पुरंदर मतदारसंघाचा भाग असलेल्या या भागात सर्व रस्ते, ड्रेनेज लाईनची कामे करून घेतली आहेत. पाणी पुरवठ्यासाठी राज्य पेयजल योजनेच्या माध्यमातून ८० टक्के काम करून घेतले आहे. त्यामुळे आता आम्हाला महापालिकेची गरज राहीलेली नाही. नगरपालिका झाल्यावर कर ठरवायचे अधिकार हे नगरपालिकेतील नगरसेवक ठरवतील. अ वर्ग नगरपालिका होईल. म्हणून आम्ही गावे वगळण्याची मागणी केली.

 

देवाची उरूळी येथील महापालिकेचा कचरा डेपो बंद करणार? याबाबत बोलताना शिवतारे यांनी सांगितले, की कालच्या बैठकीमध्ये महापालिकेने कचरा डेपो शास्त्रोक्त पद्धतीने चालवावा याला ग्रामस्थांच्यावतीने संमती देण्यात आली आहे. कचरा डेपोची जागा ही महापालिकेच्या हद्दीतच राहील असे राज्य शासनाचे प्रयत्न आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विजय शिवतारे यांनी उत्तर देणे टाळले
भाजप शिवसेना युतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये
या दोन्ही गावांसह ११ गावांचा महापालिकेत समावेश केला.
मागील अडीच वर्षे शिवसेनेचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडीचे राज्यात सरकार होते.
त्यांनी २३ गावांचा महापालिकेमध्ये समावेश केला.
सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शासनाने ही गावे महापालिकेत समाविष्ट केली.
२०१९ पासून या गावांना वाढीव दराने मिळकत कर येत आहे.
सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास मंत्रीपद होते.
परंतू त्यांच्या काळातही मिळकत कर कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही.
महापालिकेमध्ये भाजपची सत्ता होती. परंतू त्यांनीही या दोन्ही गावांचा मिळकत कर कमी करण्याबाबत कुठलाही निर्णय घेउन शासनाकडे पाठविला नाही.
मिळकत कर कमी करण्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानीक भाजपचे सत्ताधारी कमी पडले? याबाबत उत्तर देणे शिवतारे यांनी टाळले.
कायद्यातच तरतुद असल्याने मिळकत कर कमी करणे महापालिकेच्या कार्यकक्षेत नसल्यानेच स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय घेतल्याची सारवासारव शिवतारे यांनी यावेळी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | ‘We do not need a pune municipal corporation as most of the development works are in Fursungi and Uruli Devachi’ – Former Minister Vijay Shivtare

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘काँग्रेसचे प्रयत्न कमी पडले, गुजरात भाजपकडे’ – संजय राऊत

Shivsena Uddhav Thackeray Group | कोल्हापूरचे मैदान मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचा नवा मल्ल; वंचितचे हाजी अस्लम सय्यद शिवबंधनात

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पूना क्लब, इव्हॅनो इलेव्हन संघांचा दुसरा विजय !

Pune Crime | पोलीस असल्याचे सांगून 5 लाखांची खंडणी घेणाऱ्या आरोपीला पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

 

Related Posts