IMPIMP

Varsha Gaikwad | दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी वाढवली मुदत, घेतला ‘हा’ मोठा निर्णय; शालेय शिक्षण मंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती (व्हिडिओ)

by nagesh
Varsha Gaikwad | school will open as per schedule education minister varsha gaikwad

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनपरीक्षा आवेदनपत्र (Exam application form) भरण्यासाठी इयत्ता दहावी (10 th exam) आणि बारावीच्या (12 th exam ) विद्यार्थ्यांना मुदतीनंतर फॉर्म भरल्यास विलंब शुल्क (Late fee) भारावे लागत होते. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यंदाच्यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येणार नसल्याची माहिती विधानपरिषदेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज (गुरुवार) दिली. तसेच आवेदनपत्र भरण्याची मुदत देखील वाढवण्यात आल्याचे वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

राज्य शिक्षण मंडळा (State Education Board) मार्फत फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परिक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे यामध्ये तांत्रिकदृष्ट्या येत असलेल्या अडचणी पाहता शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालक यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस (Vilas Potnis) यांनी सभागृहात मांडली, सदस्य अभिजित वंजारी (Abhijit Vanjari), अनिल तटकरे (Anil Tatkare) यांनी या चर्चेत सहभाग घेतली.

 

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या, परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर विलंब शुल्क भरावे लागत होते.
मात्र, सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही.
कुठलेही विलंब शुल्क न भरता इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या
अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षेसाठीचे ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे.

याशिवाय तांत्रिक बाबींमुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
काही गावांमध्ये इंटरनेटची सुविधा (Internet access) नसल्यामुळे परीक्षेचा अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत.
आतापर्यंत 12 वीचे 14 लाख 31 हजार 667 आणि 10 वीचे 15 लाख 56 हजार 861 आवेदन पत्रे प्राप्त झाले आहेत.
शाळेच्या संपर्कात नसलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क करुन परीक्षा फॉर्म घेण्याबाबत सर्व शाळा, कॉलेजना कळवण्यात येईल
यासंदर्भात जाहीर प्रसिद्धी वर्तमानपत्रांद्वारे देण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

 

Web Title : Varsha Gaikwad | students appearing for std10 and std12 board exams will now be able to submit their exam forms till one day prior to written exams without payment of any late fee

 

हे देखील वाचा :

Debit Card Fraud | डेबिट कार्ड फ्रॉडच्या नवीन पद्धती वापरताहेत सायबर गुन्हेगार, बचावासाठी ‘या’ सूचना जाणून घ्या

BJP MLA Nitesh Rane | ‘…म्हणून मी आदित्य ठाकरे जात असताना म्याव, म्याव केलं’ – नितेश राणे

POCSO Court | पोक्सो न्यायालय : विरूद्ध लिंगाचा मित्र असण्याचा अर्थ हा नाही की तो लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे

 

Related Posts