IMPIMP

POCSO Court | पोक्सो न्यायालय : विरूद्ध लिंगाचा मित्र असण्याचा अर्थ हा नाही की तो लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे

by nagesh
Pune Crime | Bail granted to the accused who suffocated the tempo driver for not waiting for the car

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पोक्सो न्यायालयाने (POCSO Court) म्हटले की, विरूद्ध लिंगाचा (Opposite Gender) मित्र असण्याचा अर्थ हा नाही की तो लैंगिक इच्छा (sexual desire) पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे. न्यायालयाने 20 वर्षाच्या आरोपीला आपली 13 वर्षाची मैत्रिण आणि दूरची नातेवाईक असलेल्या मुलीसोबत दुष्कृत्य केल्याच्या आरोपात 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. (POCSO Court)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

यामध्ये म्हटले की, असा गुन्हा करून दोषीने मुलीचे जीवन उद्ध्वस्त केले आणि इतक्या कमी वयात स्वताचे जीवन बरबाद केले.

 

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, विशेष न्यायाधीश प्रीती कुमार घुले (Special Judge Preeti Kumar Ghule) यांनी म्हटले की, आरोपीची शिक्षा आजच्या तरुणांना एक संदेश देईल, जे आरोपीच्या वयोगटातील आहेत. अनियंत्रित वासना (Uncontrolled lust) त्यांचे भविष्य, करियर आणि प्रगतीचा सुवर्ण काळ खराब करू शकते.

पीडितेचे भविष्य अंधकारात
न्यायालयाने म्हटले की, भविष्याच्या प्रगतीचा पाया तरूणांच्या सुरुवातीच्या दिवसात तयार होतो, मग ते कोणत्याही लिंगाचे असोत. न्यायाधीशांनी म्हटले, या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्ह्यामुळे आरोपीसोबतच पीडितेचे भविष्यसुद्धा अंधकाराच्या सावटाखाली आले. आरोपीला आपल्या कृत्याचे परिणाम समजले आहेत, त्यास जास्तीत जास्त शिक्षा देणे आवश्यक नव्हते.

 

न्यायालयाने (POCSO Court) म्हटले की, अल्पवयीन पीडितेला जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकारणाच्या सेवेंतर्गत भरपाईचा अधिकार आहे.
दोषीच्या कृत्यामुळे अल्पवयीन मुलीच्या लग्नात अडचणी येतील कारण तिचा साखरपुडा अगोदरच मोडला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- POCSO Court | friend of opposite gender doesn t mean she is available for satisfying sexual desire says pocso court

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 52 नवीन रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

Girls Marriage Age | …म्हणून केंद्र सरकारने घेतला मुलींच्या विवाहाचं वय वाढवण्याचा निर्णय

Wheatgrass-Reduce Uric Acid Levels | यूरिक अ‍ॅसिडचा स्तर कमी करण्यासाठी मदत करू शकते व्हीटग्रास, वेटलॉसमध्ये सुद्धा लाभदायक

 

Related Posts