IMPIMP

Vedanta Foxconn Project | फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यामागे मोदींचा हात?, वेदांताच्या अध्यक्षांनी केला खुलासा

by nagesh
Vedanta Foxconn Project | vedanta foxconn deal pm narendra modi not behind foxconn move to gujarat vedanta chairman anil agarwal clarifies

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा (Vedanta Foxconn Project) 1 लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. सेमीकंडक्टर निर्मितीचा (Semiconductor Manufacturing) हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांता-फॉक्सकॉन ग्रुप (Vedanta Foxconn Project) आणि गुजरात सरकारमध्ये (Gujarat Government) करार झाला आहे. दरम्यान हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. तसेच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरु झाल्या आहेत. प्रकल्प गुजरात मध्ये नेल्यावरुन विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका करत आहेत. मात्र, आता यावर वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल (Vedanta Chairman Anil Aggarwal) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सर्व राज्यांमध्ये आमचे लोक गेले. केपीएमजी, आमची फॉक्सकॉनचीही टीम गेली. त्यांनी गुजरातला पसंती दिली. कोणत्याही परिस्थितीत असं समजू नका की हे सर्व नरेंद्र मोदींनी केलं आहे. आमच्या इंडिपेंडेंट एजेंसीने (Independent Agency) असं ठरवलं की गुजरातच असं एक राज्य आहे ज्याने सिलिकॉन पॉलिसी (Silicon Policy) सर्वात पहिले सुरु केली आहे, असे अनिल अग्रवाल यांनी सांगितले.

 

दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी या प्रकरणावर एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली.
यावेळी वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा किंवा त्यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात दिला जाईल,
असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी शिंदे यांना दिलं. तसेच महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार
(Central Government) एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असं नरेंद्र मोदी यांनी फोनवर
म्हटल्याची माहिती सामंत यांनी दिली.

 

 

Web Title :- Vedanta Foxconn Project | vedanta foxconn deal pm narendra modi not behind foxconn move to gujarat vedanta chairman anil agarwal clarifies

 

हे देखील वाचा :

Uday Samant | वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा प्रकल्प महाराष्ट्राला मिळणार, पंतप्रधानांचे आश्वासन, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती (व्हिडिओ)

Maharashtra Municipal Election | शिंदे गटासोबत युती करणार?, मनसेचं मोठं विधान

Vedanta Foxconn Project | पुण्याची जागा योग्य असल्याचे अहवालात नमूद असतानाही प्रकल्प गुजरातला गेला; Foxconn Project चा अहवाल फुटला

 

Related Posts