IMPIMP

Vishnu Prakash R Punglia IPO | १०० रुपयांपेक्षा कमीमध्ये येत आहे हा IPO, आतापासून ४० रुपयांचा फायदा

by sachinsitapure
Vishnu Prakash R Punglia IPO |story vishnu prakash r punglia ipo price band 94 to 99 rupee gmp reached 40 rupee

नवी दिल्ली : इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेस (Infrastructure Business) संबंधीत कंपनी विष्णु प्रकाश आर पुंगलिया (Vishnu Prakash R Punglia IPO) चा आयपीओ येत आहे. कंपनीचा आयपीओ २४ ऑगस्ट २०२३ ला खुला होईल आणि तो २८ ऑगस्टपर्यंत ओपन राहील. कंपनीचा आयपीओ सध्या सब्सक्रिप्शनसाठी खुला नाही, परंतु ग्रे मार्केटमध्ये विष्णु प्रकाश आर पुंगलियाचे (Vishnu Prakash R Punglia IPO) शेयर मोठ्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. कंपनीचे शेयर आतापासून ४० टक्क्यापेक्षा जास्त प्रीमियमवर आहेत.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

आयपीओ खुला होण्यापूर्वीच ४० रुपयाचा प्रीमियम

विष्णु प्रकाश आर पुंगलियाच्या आयपीओची प्राईस बँड ९४-९९ रुपये आहे. कंपनीच्या शेयरचे ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) आतापासूनच ४० रुपयांवर पोहचले आहे. कंपनीचे शेयर ४० टक्केपेक्षा जास्तीच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत.

जर कंपनीचे शेयर ९९ रुपयांच्या अप्पर प्राईस बँडवर अलॉट झाले आणि ४० रुपयांचा जीएमपी कायम राहिला तर विष्णु प्रकाश आर पुंगलियाचा शेयर १३९ रुपयांच्या प्राईसवर लिस्ट होऊ शकतो. कंपनीच्या पब्लिक इश्यूची टोटल साईज ३०८.८८ कोटी रुपये आहे.

५ सप्टेंबरला लिस्ट होतील कंपनीचे शेयर

विष्णु प्रकाश आर पुंगलियाच्या आयपीओमध्ये (Vishnu Prakash R Punglia IPO) शेयर्सचे अलॉटमेंट ३१ ऑगस्ट २०२३
ला फायनल होईल. तर, कंपनीचे शेयर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)
मध्ये ५ सप्टेंबरला लिस्ट होतील. कंपनीच्या आयपीओमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्स कमीत कमी १ लॉट आणि कमाल १३ लॉट
घेऊ शकतात.

कंपनीच्या आयपीओच्या एका लॉटमध्ये १५० शेयर आहेत आणि इन्व्हेस्टर्सला किमान १४८५० रुपयांची इन्व्हेस्टमेंट
करावी लागेल. विष्णु प्रकाश आर पुंगलिया केंद्र सरकार, राज्य सरकार, प्रायव्हेट संस्थांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सचे
डिजायनिंग करते आणि त्यांच्या कन्स्ट्रक्शनचे काम करते.

Related Posts