IMPIMP

Weather Update | महाराष्ट्रसाठी इशारा ! 2 दिवसात 40 डिग्रीच्या पुढे जाणार तापमान; 15 आणि 16 मार्च रोजी मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत IMD चा अलर्ट

by nagesh
Heat Wave-Weather Department | april is the hottest month in 122 years in the country heat wave weather department IMD

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाWeather Update | राजस्थान (Rajasthan) आणि गुजरातमध्ये (Gujarat) प्रति चक्रीवादळ अजूनही कायम आहे. ज्या ठिकाणी हे चक्रीवादळ (Hurricane) तयार झाले आहे, तेथील तापमानात लक्षणीय वाढ (Significant Increase In Temperature) झाली आहे. त्यामुळे गुजरातमधून येणार्‍या उष्ण वार्‍यांमुळे संपूर्ण मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. (Weather Update)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गुजरात आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) सौराष्ट्र, कच्छ, कोकण आणि राजस्थान तसेच किनारी कर्नाटकासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या आठवड्यात दिल्ली एनसीआरमध्ये (Delhi NCR) तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी, दिवसभर कडक सूर्यप्रकाश (SunLight) असेल, तापमान 34 अंशांपर्यंत जाऊ शकते. शनिवारपर्यंत तापमान कमाल 36 तर किमान 18 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

 

मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने कधीही उष्णतेची लाट येऊ शकते. 15 आणि 16 मार्च रोजी मुंबईसह ठाणे (Thane), रायगड (Raigad), पालघर (Palghar), सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत हवामान खात्याने अलर्ट (IMD Alert) जारी केला आहे. (Weather Update)

या दोन दिवसांत गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी 15 मार्च रोजी उष्णतेच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर 16 मार्च रोजी या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. दोन्ही दिवशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये यलो अलर्ट राहील.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राजधानी दिल्लीत वाढणार तापमान
देशाची राजधानी दिल्लीचे तापमान 33 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
येत्या दोन दिवसांत त्यात आणखी वाढ होईल. कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ होणार आहे.
सोमवारी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ते सामान्यपेक्षा 4 अंश सेल्सिअस जास्त आहे.

किमान तापमान 17 अंश सेल्सिअसवर पोहोचले.
हे सर्वसामान्य प्रमाणापेक्षा एक अंश सेल्सिअस जास्त आहे.
हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 37 ते 94 टक्के राहील. मंगळवारी आकाश निरभ्र असेल.
उष्णता अधिक तीव्र होईल. कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहील.

 

Web Title :- Weather Update | weather update temperature may cross 40 degrees in two days imd issued alert regarding heat wave IMD warns of heat wave on March 15 and 16 in Mumbai Thane Raigad Palghar Sindhudurg and Ratnagiri districts

 

हे देखील वाचा :

FIR On Pravin Darekar | भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध IPC 199, 200, 406, 417, 420, 465, 467 आणि 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल

NSDR Technique For Relaxation | झोपून उठल्यानंतर सुद्धा थकवा जाणवतो का? गुगल सीईओ सुंदर पिचाई यांचे हे टेक्निक येईल उपयोगी

Maggi, Coffee And Tea Price Increased | मॅगी, कॉफी आणि चहा महागला ! 9 ते 16 टक्केपर्यंत वाढली किंमत, जाणून घ्या नवीन प्राईस

 

Related Posts