IMPIMP

FIR On Pravin Darekar | भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध IPC 199, 200, 406, 417, 420, 465, 467 आणि 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल

by nagesh
Pravin Darekar | mumbai bank financial fraud scam name of pravin darekar dropped from charge sheet

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन FIR On Pravin Darekar | मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (Mumbai District Central Co-operative Bank Election) मजूर (Laborer) वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मोठा झटका बसला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा (FIR On Pravin Darekar) दाखल केला आहे. मुंबै बँकेची मध्यवर्ती शाखा फोर्ट परिसरात असल्याने तेथील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात (Mata Ramabai Ambedkar Marg Police Station) हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने (State Government) सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. या प्रकरणात आता प्रवीण दरेकर यांच्यावर काय कारवाई होणार, ते पहावे लागेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे (Maharashtra Secretary of State Dhananjay Shinde) यांची फिर्याद नोंदवून घेत प्रवीण दरेकर (BJP Leader Pravin Darekar) यांच्यवार भादंवी कलम 199, 200, 406, 417, 420, 465, 467 आणि 120(ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (FIR On Pravin Darekar)

 

मुंबै जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर हे मजूर आणि नागरी सहकार अशा दोन्ही वर्गातून उभे राहिले होते. परंतु निवडणुकीचा निकाल (Election Results) जाहीर होत असतानाच दरेकर यांना मजूर वर्गासाठी अपात्र ठरवण्यात आले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातील संचालकपदाचा राजीनामा दिला होता.

 

आपच्या तक्रारीवरुन सहकार विभागाने (Co-operation Department) नोटीस बजावत,
आपण मजूर आहात की नाही, अशी विचारणा दरेकर यांच्याकडे केली होती.
दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात (Affidavit) कुटुंबाची मालमत्ता 2 कोटी 9 लाख रुपये असल्याचे दाखवले होते.
तसेच विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना 2 लाख 50 हजार मानधन मिळत आहे.
त्यामुळे आपण प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नसल्याचेही नोटिशीत नमूद केले होते.
अखेर सहकार विभागाचे सह निबंधक बाजीवार शिंदे (Co-Registrar Bajiwar Shinde) यांनी मजूर म्हणून दरेकर यांना अपात्र घोषीत केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यानंतर आपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)
तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्याकडे दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
अखेर सहकार मंत्रालयाच्या नव्हे तर आम आदमी पक्षाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी प्रवीण दरेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

Web Title :- FIR On Pravin Darekar | FIR filed against BJP leader Praveen Darekar under IPC 199, 200, 406, 417, 420, 465, 467 and 120 (B)

 

हे देखील वाचा :

NSDR Technique For Relaxation | झोपून उठल्यानंतर सुद्धा थकवा जाणवतो का? गुगल सीईओ सुंदर पिचाई यांचे हे टेक्निक येईल उपयोगी

Maggi, Coffee And Tea Price Increased | मॅगी, कॉफी आणि चहा महागला ! 9 ते 16 टक्केपर्यंत वाढली किंमत, जाणून घ्या नवीन प्राईस

Black Salt Health Benefits | चिमुटभर काळे मीठ नष्ट करू शकते शरीरातील धोकादायक बॅक्टेरिया, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

 

Related Posts