IMPIMP

WhatsApp New Features | आता व्हॉट्सअ‍ॅपवर कॅप्शनसहीत फोटो फॉरवर्ड करता येणार; जाणून घ्या सोपी पद्धत

by nagesh
WhatsApp | meta whatsapp will soon make a big change will give new power to admin

सरकारसत्ता ऑनलाइन – WhatsApp New Features | व्हॉट्सअ‍ॅपने जगात एक जाळं निर्माण केलं आहे. मेसेज, फोटो पाठवायचे असल्याचं आपण व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सहजरित्या (WhatsApp New Features) पाठवू शकणार आहोत. व्हॉट्सअ‍ॅपवर कोणताही मेसेज, मीडिया फाइल, लिंक फॉरवर्ड करणेही अत्यंत सोपे आहे पण तुम्ही अनुभवले असेल की फोटो फॉरवर्ड केल्यावर त्याचे कॅप्शन (Caption) काढून टाकले जाते. परंतु, व्हॉट्सअ‍ॅपवर कॅप्शनसह कोणताही फोटो (Photo) फॉरवर्ड करू शकता. याबाबत एक सोपी प्रक्रिया जाणून घ्या. ज्याद्वारे युजर्स कोणताही फोटो कॅप्शनसह फॉरवर्ड करू शकणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जाणून घ्या सोपी पद्धत –

प्रथम व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा आणि त्यानंतर तुम्हाला जो फोटो फॉरवर्ड करायचा आहे त्या फोटोवर जा.

इमेज प्रेस करा आणि धरून ठेवा. यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला ‘रिप्लाय’, ‘स्टार’, ‘डिलीट’, ‘शेअर’ आणि ‘फॉरवर्ड’ असे अनेक आयकॉन दिसतील.

त्यातील ‘शेअर आयकॉन’ वर टॅप करा. लक्षात घ्या ‘फॉरवर्ड’ आयकॉनवर टॅप करण्याची गरज नाही. (WhatsApp New Features)

‘शेअर’ आयकॉनवर टॅप केल्यानंतर तुम्हाला सर्व सोशल मीडिया आणि इतर अ‍ॅप्सचा पर्याय दिसेल. येथे ‘WhatsApp’ आयकॉन सिलेक्ट करा.

त्यानंतर तुम्हाला ज्या चॅट किंवा ग्रुपवर इमेज पाठवायची आहे त्यावर टॅप करा आणि नंतर उजवीकडे तळाशी असलेल्या ‘टिक बटन’ वर टॅप करा.

यानंतर, तुम्हाला पाठवण्यापूर्वी फोटो आणि कॅप्शन एडीट करण्याचा पर्याय मिळेल.

 

दरम्यान, या ट्रिकचा वापर करताना एक नियम आहे की तुम्ही या प्रोसेसचा वापर करून एकावेळी केवळ एकच फोटो कॅप्शनसह फॉरवर्ड करू शकणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- WhatsApp New Features | Whatsapp new feature check how to forward photo with caption marathi news

 

हे देखील वाचा :

New Protine Blood Test | नवीन प्रोटीन टेस्टद्वारे 4 वर्षे अगोदर जाणून घेवू शकता ‘हार्ट अटॅक’ची रिस्क; जाणून घ्या काय सांगते संशोधन

Gunratna Sadavarte On Sharad Pawar | गुणरत्न सदावर्तेंचा शरद पवारांवर घणाघात; म्हणाले – ‘राष्ट्रपती पदासाठी उंची लागते आणि बौद्धिक…’

Raosaheb Danve | ‘भाजप वेगळा डाव टाकणार, अन्…’ – रावसाहेब दानवे

 

Related Posts