IMPIMP

Raosaheb Danve | ‘भाजप वेगळा डाव टाकणार, अन्…’ – रावसाहेब दानवे

by nagesh
Raosaheb Danve | bjp leader and union minister raosaheb danve speaks over maharashtra mlc election 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Raosaheb Danve | बुद्धिबळाचे बादशहा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हरवले आहे. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत (Maharashtra MLC Election 2022) आम्ही तोच खेळ खेळणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आमचा तो मार्ग माहीत झाला आहे, त्यामुळे ते आता त्या रस्त्याने जाणार आहेत. आम्ही आता वेगळा डाव टाकणार आहोत. भाजपचे सर्व पाचही उमेदवार निवडून आणणार आहोत,’ असा दावा भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

“विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही वेगळ्या मार्गाने जाणार असून आमचे सर्व उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) आणखी एक धक्का देणार आहोत.” असं रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले. तर, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पराभूत करण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiyaz Jaleel) यांनी केला आहे. त्यावर दानवे म्हणाले, “आम्ही खडसे यांनाच नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हरवणार आहोत. आम्ही कोणत्याही व्यक्तीला हरवण्यासाठी निवडणूक लढवत नाही.”

 

खडसेंना उमेदवारी दिली नसती तर भाजपने ही निवडणूक बिनविरोध केली असती, असेही जलील यांनी म्हटले. त्यावर दानवे म्हणाले की, “आमचा असा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीकडे गेलेला नाही. कारण, देवेंद्र फडणवीस आणि मी बुधवारी जालन्यात एकत्र होतो. आमची या विषयावर चर्चाही झाली. खडसेंना उमेदवारी देऊ नका, असा कोणताही प्रस्ताव आम्ही दिलेला नाही. त्यांच्या पक्षाचा तो विषय आहे, आम्ही कोणाचे नाव का बरे सुचवावे ?,” असं दानवे म्हणाले.

 

Web Title :- Raosaheb Danve | bjp leader and union minister raosaheb danve speaks over maharashtra mlc election 2022

 

हे देखील वाचा :

Vasant More | ‘सावध राहा रुपेश’ ! वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; शहरात खळबळ

Jalgaon Crime | खळबळजनक ! पोटच्या 5 वर्षाच्या मुलास गळफास देत 31 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; शहरात खळबळ

Maharashtra SSC Result 2022 | दहावीचा निकाल जाहीर ! यंदा मुलींची बाजी; राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के

 

Related Posts