IMPIMP

Anil Deshmukh | अनिल देशमुखांची दिवाळी ED च्या कोठडीत, न्यायालयाने सुनावली ‘एवढ्या’ दिवसांची कोठडी

by nagesh
Anil Deshmukh | chargesheet filed by cbi against anil deshmukh

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनशंभर कोटींच्या वसुली प्रकरणी आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना कोर्टाने दणका दिला आहे. अनिल देशमुख यांची सोमवारी तब्बल 13 तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. आज त्यांना सत्र न्यायालयात विशेष PMLA कोर्टात हजर केले असता कोर्टाने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना 6 नोव्हेंबर पर्यंत ईडीची कोठडी (ED Custody) सुनावली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले अनिल देशमुख (Anil Deshmukh) सोमवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

 

 

अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह (Inderpal Singh) हे देखील ईडीच्या कार्यालयात गेले होते. अनिल देशमुख यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरु असताना दिल्लीतून काही अधिकारी सायंकाळी 7.30 सुमारास मुंबईत दाखल झाले आणि थेट ईडीच्या कार्यालयात गेले. यानंतर पुन्हा एकदा अनिल देशमुख यांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात (Money laundering case) 5 वेळा समन्स बजावूनही देशमुख (Anil Deshmukh) ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नव्हते.

 

Web Title :- Anil Deshmukh | former home minister anil deshmukh has been remanded ed custody till 6th november

 

हे देखील वाचा :

PMGKY | 2 दिवसांत देशभरात बंद होणार मोफत रेशनचे वितरण ! 80 कोटी गरीब जनतेवर होणार PMGKY बंद केल्याचा परिणाम

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 93 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा मोठा दावा, म्हणाले – ‘अनिल देशमुखांच्या अटकेनंतर आता पुढचा नंबर…’

 

Related Posts