IMPIMP

Aryan Khan Drugs Case | ‘त्यांना’ फक्त आयर्नच्या अटकेत होता ‘रस’? NCB च्या SIT ला आढळून आल्या अनेक ‘त्रुटी’

by nagesh
Aryan Khan Drugs Case | cruise drugs case 60 days extension for chargesheet against aryan

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Drugs Case ) याला जामीन मिळाल्यानंतरही या प्रकरणात दररोज नवनवे गौप्यस्फोट होत आहे. आता हे प्रकरण NCB च्या SIT ने हाती घेतले असून त्यात त्यांना मोठ्या प्रक्रियात्मक त्रुटी आढळून आल्या आहेत. मुख्य म्हणजे या प्रकरणाशी संबंधितांना केवळ आयर्न खान (Aryan Khan Drugs Case) यांच्या अटकेत अधिक रस होता, असे यामध्ये आढळून आल्याची चर्चा आहे.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) यांच्यावर अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक (Nawab Malik) यांनी आरोपांची माळ लावल्यानंतर मुंबईतील एनसीबीची ६ प्रकरणे दिल्ली युनिटकडे हलविण्यात आले आहे.
तसेच आयर्न खान (Aryan Khan Drugs Case) तपास प्रकरणातून समीर वानखेडे यांना बाजूला करण्यात आले आहे.
आता या प्रकरणाचा तपास दिल्लीतील वरिष्ठ अधिकारी संजय सिंह (Sanjay Singh) यांच्याकडे देण्यात आला आहे.
या दिल्ली टीमला या प्रकरणात काही त्रुटी आढळून आल्या आहेत.
हे अधिकारी केवळ आयर्न खानच्या अटकेसाठी उत्सुक होते. त्यांनी इतर अनेकांना ‘बोर्ड’ करण्याची परवानगी दिली.
शिवाय संपूर्ण जप्तीशिवाय क्रुझला प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली.
या प्रकरणातील तपास अधिकारी नियमित छापे आणि जप्ती प्रक्रियेपासून विचलित झाले होते, असे दिल्ली टीमचे मत बनले असल्याचे समजते.

 

Web Title : aryan khan drugs case shah rukh khan son aryan khan ncb officer sameer wankhede sanjay singh delhi ncbs sit finds several errors

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Pandharpur Kartiki Ekadashi Yatra | तब्बल 20 महिन्यांनंतर पंढरपूर पुन्हा एकदा वारकर्‍यांनी गजबजणार ! जिल्हा प्रशासनाकडून कार्तिकी यात्रेस परवानगी

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडव निष्काळजीपणामुळे; गुन्हा दाखल

Global Air Quality Index | मुंबई जगातील 7 व्या क्रमांकाचे प्रदूषित शहर; जाणून घ्या टॉप 6 शहरांची नावे 

Related Posts