IMPIMP

Crime News | मुंबईत गणपती विसर्जनदिनी 5 मुले बुडाली; पुण्यात इंद्रायणी नदीत 2 जण बुडाले

by nagesh
Crime News | 5 children drowned in Mumbai on Ganpati Immersion Day; 2 drowned in Indrayani river in Pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Crime News | वर्सोवा गाव येथे गणपती विसर्जनदिनी मूर्तीचे समुद्रात विसर्जन करताना पाच मुले समुद्रात बुडाली. रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. स्थानिकांनी दोन मुलांना वाचवले असून अद्याप तीन मुले बेपत्ता आहेत. बेपतांच्या शोधासाठी दुर्घटनास्थळ आणि आसपासच्या समुद्रात शोधमोहीम राबवली जात आहे. त्यासाठी विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे. दरम्यान, वाचवण्यात आलेल्या मुलांना कूपर रुग्णालयात दाखल (Crime News) करण्यात आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पिंपरीत गणपती विसर्जनदिनी इंद्रायणी नदीत दोन जण बुडाले

पिंपरी : आळंदीरोड येथील इंद्रायणी नदीत गणेश विसर्जनावेळी रविवारी सायंकाळी दोन मुले बुडल्याची घटना घडली. दत्ता आबासाहेब ठोंबरे (वय २०), प्रज्वल रघुनाथ काळे (वय १८) अशी या मुलांची नावे आहेत. यापैकी प्रज्वलचा मृतदेह मिळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आळंदी रोडवरील हवालदार वस्तीमधील जवळच असलेल्या इंद्रायणी नदीत नागरिक गणेश मूर्तीचे विसर्जन करतात. ठाकरे कुटुंबदेखील घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी एकत्र आले होते. त्यावेळी दत्ता आणि प्रज्वल गणेशमूर्ती घेऊन पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडून बेपत्ता झाले. दरम्यान घटनास्थळी एमआयडीसी भोसरी पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. दोन तासाच्या शोध मोहिमेनंतर प्रज्वलचा मृतदेह मिळून आला. मात्र दत्ताचा मृतदेह शोधण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

 

Web Title : Crime News | 5 children drowned in Mumbai on Ganpati Immersion Day; 2 drowned in Indrayani river in Pune

 

हे देखील वाचा :

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत घसरणीचा ‘कल’ कायम ! 10,000 रुपयांनी ‘स्वस्त’ मिळतंय एक तोळा, जाणून घ्या नवीन दर

mParivahan | आता संपुर्ण देशात कुठंही फिरताना ‘DL’ आणि ‘RC’ सोबत ठेवण्याची गरज नाही; ‘DigiLocker’ सुद्धा असेल मान्य

Pune Crime | गांजा ओढणार्‍या 3 अल्पवयीन मुलांचा एकमेकांवर चाकू हल्ला; पुण्यातील कोंढवे -धावडे येथील घटना

 

Related Posts