IMPIMP

mParivahan | आता संपुर्ण देशात कुठंही फिरताना ‘DL’ आणि ‘RC’ सोबत ठेवण्याची गरज नाही; ‘DigiLocker’ सुद्धा असेल मान्य

by nagesh
New Driving Licence Rules | central ministry changed rule to get driving licence easily see full detail

नवी दिल्ली : वृत्तसंस्था mParivahan | राष्ट्रीय राजधानी दिल्ली-एनसीआरसह देशाच्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता वाहन चालकांना ड्रायव्हिंग लायसन्स (DL) आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. आता रस्त्यावर वाहन चालक ट्रॅफिक पोलीस आणि परिवहन विभागाला डिजी-लॉकर (DigiLocker) प्लॅटफॉर्म किंवा एम-परिवहन (mParivahan) मोबाइल अ‍ॅपमध्ये डिजिटल प्रकारे ठेवलेली कागदपत्रे दाखवू शकतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या आदेशानंतर सर्व राज्यात एम-परिवहन (mParivahan) अ‍ॅप आणि डिजी लॉकरमधील कागदपत्र मान्य करावी लागतील. आता यास कायदेशीर मान्यता सुद्धा प्रदान करण्यात आली आहे. या आदेशानंतर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या वृत्तपत्रांमध्ये याबाबत जाहिरात देऊन लोकांना जागृत करण्यात येत आहे.

जर आता तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाच्या रजिस्ट्रेशनचे कार्ड एम-परिवहन मोबाइल अ‍ॅप आणि डीजी लॉकरमध्ये असेल तर ते देशभरात मान्य असेल.
आतापर्यंत एम-परिवहन अ‍ॅपवर हे कागदपत्र उपलब्ध होते,
परंतु त्यांना कायदेशीर मान्यता दिली जात नव्हती, परंतु आता त्यास कायदेशीर मान्य करण्यात आले आहे.

 

डीजी लॉकरमध्ये ठेवलेल्या कागदपत्रांना आता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मान्य करण्यात आले आहे.

परिवहन विभाग आता एम परिवहन मोबाइल अ‍ॅप आणि डीजी लॉकरमध्ये ठेवलेल्या कागदपत्रांना मान्यता देण्यासाठी मोटर व्हेईकल अ‍ॅक्ट अंतर्गत नोटिफिकेशन सुद्धा जारी केले आहे.
आता डिजी-लॉकर किंवा एम-परिवहनवर उपलब्ध ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीचा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड
सुद्धा माहिती आणि तंत्रज्ञान कायदा 2000 च्या तरतुदींनुसार समतुल्य मानला जाईल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title : mParivahan | driving license and dl are not compulsory to carry digilocker will valid documents how to store apps

 

हे देखील वाचा :

Pune Crime | गांजा ओढणार्‍या 3 अल्पवयीन मुलांचा एकमेकांवर चाकू हल्ला; पुण्यातील कोंढवे -धावडे येथील घटना

Live In Relationship |’लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये खर्च दोघांनी करावा किंवा कुणी एकाने, हा गुन्हा नाही – हायकोर्ट

Bal Bothe : रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे आणखी ‘गोत्यात’; जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts