IMPIMP

Lok Sabha Elections 2024 | उर्मिला मातोंडकरला पाडणाऱ्या गोपाळ शेट्टींना डच्चू?

by sachinsitapure

मुंबई : केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून आपल्या कामाची छाप पूर्वी सोडलेले केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांना मुंबई उत्तर मतदारसंघातून लोकसभेसाठी उतरवणे भाजपला भाग पडले आहे.

याच मतदारसंघातून भाजपचे गोपाळ शेट्टी निवडून आले. त्यांनी काॅंग्रेसच्या स्टार प्रचारक उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होता. तरीही शेट्टींचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.याचा अर्थ गोयल यांची प्रतिमा अधिक बलशाली असल्याचे मानले जात आहे.

पियुष गोयल पंतप्रधान मोदींचे विश्वासू असून राज्यसभेवर खासदार, नंतर ऊर्जा, रेल्वे, वित्त मंत्रालय आणि कॅामर्स मिनिस्ट्री सांभाळण्याचा अनुभव त्यांना आहे. स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू आहे. मुंबई उत्तर मतदारसंघात उत्तर भारतीय आणि अन्य भाषिक मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. भाजपचा सर्वाधिक वोटबॅंक असलेल्या मतदारसंघापैकी एक हा मतदारसंघ भाजप सहज खेचून आणण्यासाठी खेळी करत आहे.

अमित शहांची सायंकाळी संभाजीनगरमध्ये सभा, महाराष्ट्र दौऱ्यात सभा-बैठकांचा धडाका, जागावाटपाचा प्रश्न सोडवणार

Related Posts