IMPIMP

Maharashtra Unlock | राज्यातील शॉपिंग मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी, सुधारित शासन निर्णय जारी

by nagesh
Mumbai Unlock | mumbai may be unlocked in next week due decrease in corona cases said bmc Additional Commissioner Suresh Kakani

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Unlock | राज्यात कोरोनाची लाट (Corona wave) आटोक्यात आल्यामुळे निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करण्यात आले आहेत. दुकानं आणि शॉपिंग मॉल्स (Shopping malls) रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मॉल सुरु ठेवण्याची परवानगी (Maharashtra Unlock) देताना 18 वर्षाखालील मुलांना मॉलमधील प्रवेशासंदर्भात कोणतीही सुचना देण्यात आली नव्हती. मात्र, आज (सोमवार) सार्वजनिक आरोग्य विभागाने (Department of Public Health) सुधारित मार्गदर्शक सूचना (guidelines) जारी केली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

नवीन आदेशानुसार, राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवशी रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन आणि कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे (Corona preventive vaccine) दोन डोस घेतले असले पाहिजेत. तसेच दोन्ही डोस घेऊन ज्यांचे 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मॉलमध्ये प्रवेश करताना दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र (ID card) मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखवणे बंधनकारक असल्याचे सुधारित आदेशात म्हटले आहे.

 

 

18 वर्षाखालील मुलांना द्यावा लागणार वयाचा पुरावा
राज्यातील 18 वर्षाखालील मुलांचे अद्याप लसीकरण झालेले नाही. 18 वर्षाखालील ज्या मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेश करायचा आहे. त्यांना त्यांच्या वयाचा दाखला म्हणून आधारकार्ड, आयकर विभागाने निर्गमित केलेले पॅन कार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title :- Maharashtra Unlock | Shopping malls in the state allowed to continue till 10 pm, revised ruling issued

 

हे देखील वाचा :

Driving License साठी ‘या’ 5 राज्यात आता 40 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना मेडिकल सर्टिफिकेट अपलोड करण्याची आवश्यकता नाही, जाणून घ्या

BHR Scam | बीएचआर घोटाळा ! भाजपचे आमदार चांदूलाल पटेल यांचा अटक पूर्व जामीन मंजूर

Rain in Maharashtra | आगामी 3 दिवस राज्यात जोरदार पाऊस बरसणार; पुण्यासह 7 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी

 

 

Related Posts