IMPIMP

Driving License साठी ‘या’ 5 राज्यात आता 40 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना मेडिकल सर्टिफिकेट अपलोड करण्याची आवश्यकता नाही, जाणून घ्या

by nagesh
New Driving Licence Rules | central ministry changed rule to get driving licence easily see full detail

सरकारसत्ता ऑनलाइन  – Driving License | केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाच्या (Ministry of Road Transport and Highways) निर्देशाने परिवहन विभागाने (Transport Department) ऑनलाइन (Online) तरतुदींच्या अंतर्गत सारथी सॉफ्टवेयर (Sarathi parivahan software) मध्ये मोठा बदल केला आहे. आता 40 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना डीएल (Driving License) बनवण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट (Medical Certificate) अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि झारखंड सारख्या राज्यांनी 40 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या लोकांसाठी ही सुविधा सुरू केली आहे. त्यांना आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी किंवा रिन्यूअलसाठी मेडिकल सर्टिफिकेटच्या ऐवजी सेल्फ डेक्लरेशन द्यावे लागेल.

कोणत्याही प्रकारची गाडी चालवण्यास पूर्णपणे निरोगी असल्याचे सेल्फ डेक्लरेशनमध्ये सांगावे लागेल. 40 च्या वरील लोकांना अजूनही मेडिकल सर्टिफिकेट अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच रिन्यूअलसाठी सुद्धा मेडिकल सर्टिफिकेट देणे अनिवार्य आहे.

केंद्र सरकार ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्यासंबंधीत 100 टक्के सेवा ऑनलाइन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
ट्रान्सपोर्ट अथॉरिटीजच्या बहुतांश सेवा आता ऑनलाइन सुरू केल्या आहेत.
देशातील प्रत्येक आरटीओचे कामकाज जवळपास ऑनलाइन करण्यात आले आहे.

परिवहन विभाग प्रयत्न करत आहे की, लायसन्स रिन्युअल, डुप्लीकेट लायसन्स, अ‍ॅड्रेस चेंज आणि आरसी बनवण्यासाठी लोकांना यावे लागू नये, घरबसल्याच कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा मिळावी.
ऑनलाइन सिस्टमनंतर केवळ ड्रायव्हिंग टेस्ट आणि फिटनेससाठीच लोकांना आरटीओत जावे लागेल.

 

Web Title :- driving license mandatory requirement of medical certificate for below 40 years of age group is over

 

हे देखील वाचा :

BHR Scam | बीएचआर घोटाळा ! भाजपचे आमदार चांदूलाल पटेल यांचा अटक पूर्व जामीन मंजूर

Rain in Maharashtra | आगामी 3 दिवस राज्यात जोरदार पाऊस बरसणार; पुण्यासह 7 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 128 नवीन रुग्णांची नोंद, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts