IMPIMP

Police Inspector Arrested In Robbery Case | व्यावसायिकाचे दोन कोटी लुटल्याच्या प्रकरणात पोलीस निरीक्षकाला अटक, पोलीस दलात प्रचंड खळबळ

by sachinsitapure

नवी मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Police Inspector Arrested In Robbery Case | मुंबई पोलीस (Mumbai Police) असल्याचे भासवून सहा जणांनी एका व्यावसायिकाकडून दोन कोटी रुपये लुटले. याप्रकरणी एका 55 पोलीस निरीक्षकाला सोमवारी (दि.1 एप्रिल) अटक करण्यात आली आहे. ही घटना 29 मार्च रोजी व्यावसायिक मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar Mumbai) येथील त्यांच्या राहत्या घरातून नवी मुंबईतील (Navi Mumbai) तुर्भे एमआयडीसीकडे (Turbhe MIDC) जात असताना वाशी ब्रिज (Vashi Bridge) खाली दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या कारवाईमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत 54 वर्षीय व्यावसायिकाने वाशी पोलीस ठाण्यात (Vashi Police Satation) फिर्य़ाद दिली आहे. पोलीस निरीक्षक नितीन भिकाजी विजयकर PI Nitin Bhikaji Vijaykar (वय-55) रा. प्रसाद अपार्टमेंट, भांडुप पश्चिम, मुंबई) यांच्यावर आयपीसी 395, 363, 341, 342, 170, 120ब, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय नाळे यांनी विजयकर यांना अटक केली आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक नाळे यांनी ठाणे ग्रामीण पोलीस (Thane Rural SP) अधीक्षकांना एक अहवाल पाठवला आहे.

वाशी परिसरातील पाम बीच रोडजवळ (Palm Beach Road Vashi) फिर्यादी व्यावसायिकाला सहा अनोळखी व्यक्तींनी वाहने आडवी लावून अडवले. त्यांनी मुंबई पोलीस असल्याचे भासवले. तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असल्याच्या अनेक तक्रारी आल्याचे सांगून यामध्ये तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना अडकवण्याची धमकी आरोपींनी दिली. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर फिर्यादी यांना वाशी येथील एका फ्लॅटमध्ये नेले. त्याठिकाणी फिर्य़ादी यांना शिवीगाळ करुन धमकी देत दोन कोटी रुपये घेऊन आरोपी फरार झाले.

या घटनेनंतर व्यावसायिकाने 30 मार्च रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. तपासादरम्यान, पोलीस निरीक्षक नितीन भिकाजी विजयकर यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना अटक केली, असे पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी अधीक्षकांना दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.

Pune Katraj Crime | पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड, कोयते जप्त

Related Posts