IMPIMP

Money Laundering Case | ईडीच्या चौकशीला अनिल देशमुखांची गैरहजेरी, शोधासाठी तपास यंत्रणा झाली ‘अ‍ॅक्टीव्ह’

by nagesh
Anil Deshmukh | Former home minister anil deshmukhs bail application will be heard on 8 april

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन   मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात (Money Laundering Case)  ईडीने (ED) गेल्या पाच महिन्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना चौकशीला हजर राहण्याचीसाठी पाच वेळा समन्स जारी (Summons issued) केले होते. मात्र, ते एकदाही चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. त्यामुळे अज्ञातवासात गेलेल्या अनिल देशमुख यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation Agency) हालचाली पुन्हा वाढल्या असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात (Money Laundering Case) सीबीआयने त्यांच्या कार्यालय व घरावर 5 वेळा छापे टाकले आहेत.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अनिल देशमुख यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचा ठावठिकाणा मिळवण्यासाठी सक्तवसुली संचालनालय (ED) आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभगाला (CBI) कळवण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसात त्यांना पकडण्यासाठी मुंबई (Mumbai), नागपूर (Nagpur) या ठिकाणी सीबीआयकडून (CBI Raids) छापेमारी केली जाण्याची (Money Laundering Case) शक्यता आहे.

अनिल देशमुख यांनी आपल्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी न्यायालयात (Court) धाव घेतली आहे. परंतु, त्यांना दिलासा न मिळाल्याने सीबीआय व ईडीकडून अटकेची (Money Laundering Case) कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनिल देशमुख अज्ञातवासात आहेत. मात्र, वरिष्ठांनी त्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्याने तपास यंत्रणांनी पुन्हा गतीने हालचाली सुरु केल्या असल्याचे सुत्रांनी सांगितले.

 

Web Title: Money Laundering Case | investigation agency like cbi and ed start search anil deshmukh in money laundering case

 

हे देखील वाचा :

Bitcoin ETF झाले लाँच, कशी आणि कुठे करू शकता गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! फी भरण्यासाठी पैसे मागितल्यानंतर नवर्‍यानं बायकोला चक्क विहिरीत ढकललं, पण…

Indian Pension System | पेन्शन सिस्टमबाबत मोठी बातमी, जाणून घ्या निवृत्तीनंतरच्या नियोजनांवर काय सांगतो अहवाल

Gita Gopinath | IMF चं ‘चीफ इकॉनॉमिस्ट’ पद सोडणार गीता गोपीनाथ, Harvard University मध्ये परतणार

Pune Crime | कोकणात आंब्याची बाग, 1 बीएचके फ्लॅटचे स्वप्न दाखवून फसवणूक; पुण्यातील बाप-लेकासह तिघांना अटक

Rajesh Tope | ‘दुसरी लाट ओसरलेली नाही, दिवाळीनंतर कोरोना वाढण्याची शक्यता’ – आरोग्य मंत्री राजेश टोपे

Related Posts