IMPIMP

Pune Crime | कोकणात आंब्याची बाग, 1 बीएचके फ्लॅटचे स्वप्न दाखवून फसवणूक; पुण्यातील बाप-लेकासह तिघांना अटक

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Bharti Vidyapeeth Police Station - Fraud of crores with the lure of excess return on investment without an investment policy

पुणे / पिंपरीसरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | कोकणात आंब्याची बाग (Mango orchard in Konkan), त्याला लागून घर असावे, असे अनेकांचे स्वप्न असते़ निवृत्तीनंतर गावाकडे जाऊन राहण्याचे स्वप्न पहाणार्‍यांना भुलविणार्‍या जाहिराती देऊन तब्बल ७२ लाख रुपयांना गंडा (Pune Crime) घालतल्याचा प्रकार समोर आला आहे. निगडी पोलिसांनी (Nigdi Police Station) ५ जणांवर गुन्हा दाखल करुन वडिल व त्यांच्या दोन मुलांना अटक (Arrest in Cheating Case) केली आहे.

गणेश रामचंद्र बांदकर Ganesh Ramchandra Bandkar (वय ५७), अभिषेक गणेश बांदकर Abhishek Ganesh Bandkar (वय ३४) आणि सागर गणेश बांदकर Sagar Ganesh Bandkar (वय २८, सर्व रा. कम्फर्ट कुशन, प्राधिकरण, निगडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी रवी चिंतामणी भंडारे (वय ६५, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. ५३८/२१)

दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदकर यांचे निगडी प्राधिकरणात कार्यालय आहे.
त्यांनी फिर्यादी व इतर दोघांना कोकणातील सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यातील देवगड (Devgad) तालुक्यातील
पोयरे येथे जागा तसेच आंब्याची कलमे (devgad mango) लावून १ बीएचके फ्लॅटचा बंगला, कंपाऊड व तीन वर्षांचा
मेंटेनन्स इत्यादी सर्व काही रितसर करुन देतो, असे सांगितले.
तसे नाही दिले तर त्यांनी दिलेल्या पैशांचा मोबदला म्हणून त्या पैशांचे होणारे व्याज, त्याचा होणारा लाभांश व रक्कमेची दामदुपटीने रक्कम परत देतो, असे बांदकर यांनी फिर्यादी व इतरांना आश्वासन दिले.
तिघांकडून ७२ लाख ४४ हजार ५०० रुपये २०१७ मध्ये घेतले.

परंतु, त्याप्रमाणे आरोपींनी काहीही करुन दिलेले नाही.
तसेच जागेचा फेरफार हा देखील राणे यांच्या नावाने असल्यामुळे नमूद जागेचा ७/१२ देखील फिर्यादी यांच्या नावावर होत नाही.
त्यामुळे फिर्यादी यांना त्यांनी दिलेल्या पैशांचे मोबादल्यामध्ये जागा तसेच आंब्याची कलमे लावून १ बीएचके फ्लॅटचा बंगला वगैरे काहीही न देता फसवणूक केल्याचा महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कलमाखाली गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Pune Crime | Fraud by dreaming of a mango orchard in Konkan, 1 bhk flat; Ganesh Ramchandra Bandkar arrested along with son’s sagar and abhishek in Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात पोलिसांच्या ‘खबर्‍या’ समजून तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार ! खडकी पोलिसांकडून एकाला अटक

Crime News | धक्कादायक ! घरी बोलावून एक्स बॉयफ्रेंडने प्रेयसीची केली क्रुर पद्धतीने हत्या; सपासप 7 वार करुन केलं रक्तबंबाळ, अन्…

Thane Gang Rape | नराधम प्रियकराने प्रेयसीला केलं मित्रांच्या स्वाधीन, ठाण्यात चौघांकडून 26 वर्षीय युवतीवर कारमध्ये आळीपाळीनं बलात्कार

 

Related Posts