IMPIMP

Palghar Anti Corruption | 70 हजाराचे लाच प्रकरण ! रात्री 11 वाजता ACB चा ‘सापळा’; कारवाईत भाजीपाला विक्रेता आणि पोलीस कर्मचारी ‘जाळ्यात’, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

पालघर : सरकारसत्ता ऑनलाइन  Palghar Anti Corruption | एसीबीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी लाचखोर वेगवेगळ्या युक्त्या लढवितात. रात्री उशिरा लाच देण्यासाठी बोलावणे ही एक युक्ती वापरली जाते. त्यावरही आता एसीबीने मात केली आहे. विक्रमगड पोलीस ठाण्यात (Vikramgad Police Station) दाखल गुन्ह्यामध्ये अटक करु नये, यासाठी मदत करण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागणार्‍या पोलीस काँस्टेबलला खासगी व्यक्तीसह लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री ११ वाजता सापळा (Palghar Anti Corruption) रचून रंगेहाथ पकडले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पोलीस कॉन्स्टेबल अशोक अनंता वाघ police ashok ananta wagh (विक्रमगड पोलीस ठाणे), भाजीपाला विक्रेता ऋषिकेश रामदास ढोन्नर (वय २२, रा. विक्रमगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणात २३ वर्षाच्या तरुणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार हे  विक्रमगड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपीचे वाहनचालक आहे.

 

 

तक्रारदार यांच्या वाहन मालकांना त्यांचे विरुद्ध दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मदत करतो, असे म्हणून तक्रारदार व त्यांचे वाहन मालक यांच्याकडे ७० हजार रुपयांची मागणी करुन त्यांच्याकडे पाठपुरावा करत होते. शेवटी त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Palghar Anti Corruption) पडताळणी केल्यावर लाच मागितले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अशोक वाघ याने तक्रारदार यांना रात्री ११ वाजता बोलावले. त्याप्रमाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने विक्रमगड पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदार यांना भाजीपाला विक्रेता ऋषिकेश ढोन्नर याच्याकडे पैसे देण्यास सांगितले. तक्रारदार यांनी ढोन्नरकडे पैसे देताच लाच लुचपत प्रतिबंधक
विभागाने त्याला पकडले. पाठोपाठ अशोक वाघ याला पकडण्यात आले.

 

 

पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले (ACB SP Panjabrao Ugale), अपर पोलीस अधीक्षक निलिमा
कुलकर्णी (Addl SP Nilima Kulkarni) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप
(DySp Navnath Jagtap), पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, हवालदार नितीन पागधरे, पोलीस नाईक
संजय सुतार, दीपक सुमडा, नवनाथ भगत यांनी ही कारवाई केली.

 

Web Title : Palghar Anti Corruption | policeman of vikramgad police station arrested by acb while taking bribe of 70 thousand

 

हे देखील वाचा :

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 254 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

LIC Aadhaar Shila | महिलांसाठी ‘एलआयसी’नं आणली एक खास पॉलिसी; लाखोंचा होईल ‘लाभ’; जाणुन घ्या

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 239 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts